Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिक्षकाने मेसेज करून विद्यार्थिनीला बोलावले अन् जबरदस्तीने मारली मिठी.

शिक्षकाने मेसेज करून विद्यार्थिनीला बोलावले अन् जबरदस्तीने मारली मिठी.

मुंबई : विलेपार्ले पूर्व परिसरात एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. गणेश देवळूखकर (वय ४७) असे या आरोपी शिक्षकाचे नाव असून, त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी (वय १६) हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी गणेश देवळूखकर याने पीडितेला व्हॉट्सॲपवर मेसेज करून भेटण्यासाठी बोलावले होते. ती भेटीसाठी गेली असता, आरोपीने तिचा हात पकडून तिला पाठीमागून ओढले. त्यानंतर जबरदस्तीने मिठी मारून तिचा विनयभंग केला आणि लैगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या प्रकारानंतर पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गणेश देवळूखकर याच्याविरुद्ध BNS कलम ७५(३) तसेच अन्य कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावून ताब्यात घेतले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka