सोलापूर : मित्राचे दीड महिन्यांपूर्वी निधन झालेल्या त्याच्या विधवा पत्नीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
मित्राच्या पत्नीवर घरात घुसून बलात्कार करण्यात आला आहे. पीडित महिला ही विडी कामगार आहे. या घटनेनं सोलापुरात खळबळ उडाली आहे. वळसंग पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
The post सोलापूर हादरलं! मित्राचे दीड महिन्यांपूर्वी निधन अन् त्याच्या पत्नीवर बलात्कार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

