Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोलापूर! टेम्पोच्या धडकेत दोन जिवलग मैत्रिणींचा मृत्यू.

सोलापूर! टेम्पोच्या धडकेत दोन जिवलग मैत्रिणींचा मृत्यू.

सोलापूर : मोहोळ तालुक्यात टेम्पोने धडक दिल्यामुळे दोन जिवलग मैत्रिणींना जीव गमवावा लागला आहे. मोहोळ तालुक्यातील नजिक पिंपरी गावाजवळील ही अपघाताची घटना घडली.

अकरावीत शिकणारी प्रज्ञा धनाजी कोकाटे आणि तिची मैत्रीण बारावीत शिकणारी स्नेहल काशिनाथ वाघमोडे अशा अपघातात मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत.

प्रज्ञा ही स्कुटीवरून स्नेहलला घेऊन मोहोळवरून कुरुल गावाला जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या धडकेत प्रज्ञा जागीच ठार झाली तर स्नेहल ही गंभीर जखमी झाल्यामुळे तिला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

प्रज्ञा ही अकरावीत नेताजी महाविद्यालयात शिकत होती तर स्नेहल ही राष्ट्रमाता इंदिरा कन्या महाविद्यालयात शिकत होती. याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka