Dailyhunt
सोलापूरमध्ये नर्तिकेवरून गोळीबार; तू मला काय भुरटा समजतो काय.

सोलापूरमध्ये नर्तिकेवरून गोळीबार; तू मला काय भुरटा समजतो काय.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात टेंभुर्णी पोलिस स्टेशनच्या हद्दीत कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सूरज पवार (रा. पंढरपूर) आणि त्याच्या तीन अनोळखी मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोकनाट्य कला केंद्रात नृत्यांगणांची बैठक लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकावर गावठी बंदुकीने पायावर गोळी झाडण्यात आली आहे. यात एक जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. ९) मध्यरात्री घडली आहे. या गोळीबारात वाखरी (ता. पंढरपूर) येथील देवा बाळु कोठावळे (वय २७, व्यवसाय लॉज) गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डाव्या मांडीत गोळी घुसली आहे. याप्रकरणी सूरज पवार (रा. पंढरपूर) आणि त्याच्या तीन अनोळखी मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे‌. यापैकी तिघांना टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टेंभुर्णीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वेणगाव येथील जय मल्हार लोकनाट्य कला केंद्रामध्ये ही घटना घडली आहे.

देवा कोठावळे याच्या फिर्यादीनुसार, तो मित्र ज्ञानेश्वर बंदपट्टे, वैभव ननवरे आणि सचिन सांळुखे माढा तालुक्यातील वेणेगाव येथील जय मल्हार लोकनाट्य कला केंद्रात आले होते. त्याच वेळी संशयित आरोपी आरोपी सूरज पवार हाही तिथे आला होता‌. कला केंद्रात डान्सची बैठक लावण्यासाठी येथील मालकाकडे मागणी केली असता मालकाने अर्धा तास राहिला, म्हणून सांगितले. यावेळी ज्ञानेश्वर बंदपट्टे याने दोन्ही ग्रुपची मिळून एकच बैठक लावल्यानंतर आपले पैसे वाचतील असे म्हणाला. यावेळी आरोपी सूरज पवार याला राग आला आणि ‘तू मला काय भुरटा समजतो काय?’ म्हणून शिवीगाळ करू लागला. हा वाद वाढत असताना सर्वजण कला केंद्राच्या पार्किंगकडे गेले. यावेळी फिर्यादी देवा कोठावळे याने वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सूरज पवार याच्या बरोबर असलेल्या तिघांपैकी एकाने फिल्मी स्टाईलने आपल्या कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून कोठावळेच्या पायावर फायरींग केली. या फायरींगमध्ये गोळी डाव्या पायाच्या मांडीमध्ये घुसून तो जखमी झाला. त्यास तातडीने टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटना समजतात टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने पाहणी केली. याप्रकरणी आरोपी सूरज पवार याच्यासह त्याच्या तीन साथीदारांविरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांना घटनास्थळी गोळीची रिकामी पुंगळी सापडली आहे. पुढील तपास टेंभूर्ण पोलिस करत आहेत.

उपसरपंच मृत्यू प्रकरणातील नर्तिका पूजाचा जुना Video व्हायरल; मेरे पास चार…

उपसरपंच अंखड बुडाला होता नर्तिकेच्या प्रेमात; कसा झाला शेवट पाहा…

प्रेमात वेडा! बार्शीत नर्तिकेच्या घरासमोर माजी उपसरपंचाने केली आत्महत्या; कारण…

प्रेयसीसोबत लॉजवर नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; घाबरून मारली उडी…

दोन लग्न झालेल्या महिलेचे माजी सरपंचासोबत जुळले प्रेमसंबंध अन् पुढे…

पुणे जिल्ह्यातील महिलेच्या खूनाचं गूढ उलगडलं; बिबट्या नव्हे तर उपसरपंच पुतण्या…

The post सोलापूरमध्ये नर्तिकेवरून गोळीबार; तू मला काय भुरटा समजतो काय… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka