पुणे : पुणे विमानतळाच्या भिंतीजवळ आज (बुधवार) एकापाठोपाठ 10 सिलेंडर फुटल्याने घबराट पसरली होती. अग्निमशन दलाकडून तातडीने यावर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
पुणे शहरातील लोहगाव विमानतळ भिंतीलगत असलेल्या होरिजन डेव्हलपर यांची कन्स्ट्रक्शन साइटच्या मागील बाजूस असलेल्या दीपक देवकर यांच्या मोकळ्या जागेत पत्राच्या शेडमध्ये अनधिकृतपणे गॅस सिलेंडरचा साठा होता. त्या ठिकाणी आज दुपारी काही सिलेंडरचा स्फोट झाला होता. एकापाठोपाठ १० सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात घबराट पसरली होती. अग्निमशन दलाकडून तातडीने यावर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.
सिलेंडरचा स्फोट झाला त्या परिसरात आणखी ५० सिलिंडर असल्याची माहिती पुढे आली आहे. विमाननगरात इमारतीजवळ १० सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिसरात मोठे नुकसान झाले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
The post स्फोट! पुणे विमानतळाजवळ धडाधड फुटले 10 सिलेंडर… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

