Dailyhunt
सूनेचे सासऱ्याशी होते अनैतिक संबंध अन् एक दिवस.

सूनेचे सासऱ्याशी होते अनैतिक संबंध अन् एक दिवस.

हमदाबाद (गुजरात): खेडा जिल्ह्यात एका सूनेनेच आपल्या सासऱ्याची अनैतिक संबंधातून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

सासरा आणि सून घरातल्या एका खोलीत शारिरीक संबंध ठेवायचे. या बदल्यात सासरा सूनेला पैसे देत होता. पण याच पैशांसाठी सूनेने सासऱ्याला ठार केलं. पोलीस चौकशीत याचा उलगडा झाला आहे. आरोपी सून फेसबुकच्या माध्यमातून एका युवकाच्या संपर्कात आली होती. युवकाने तिला परदेशात नेण्याचे आश्वासन दिले होते. पण यासाठी 2 लाखांची गरज होती. विदेशात जाण्याच्या हव्यासापोटी सूनेने पैसे मिळावेत म्हणून सासऱ्याचे गुप्तांग कापून हत्या केली. यानंतर पोलिसांनी सूनेला बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास सुरु आहे.

खेडा जिल्ह्याच्या डाकोर येथील जगदीश शर्मा (वय ७५) तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. कुटुंबाने सर्व ठिकाणी शोध घेऊनही त्यांचा काही पत्ता लागत नव्हता. मोठा मुलगा विजयभाई शर्मा याच्यासह काही जणांना जगदीश शर्मा यांचा मृतदेह नग्न अवस्थेत पडलेला होता. नंतर लगेच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. डोकं आणि गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. दुसरीकडे तक्रारदार मुलाने आपल्या छोट्या भावाच्या पत्नी मनिषा शर्मावर संशय असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मनिषा शर्माची चौकशी केली. कसून चौकशी केली असता तिने सांगितलेले घटनाक्रम ऐकून सगळेच चक्रावले.

पोलीस चौकशीत आपला गुन्हा कबूल करताना सून मनिषा शर्माने सांगितले की, सासऱ्याशी आपण नेहमीच शारिरीक संबंध ठेवत होते. याबदल्यात सासरे माझी आर्थिक मदत करत होते. पण जवळपास एक महिन्यापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून एका युवकासोबत ओळख झाली होती. मित्राने परदेशात नेण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी 2 लाखांची गरज होती. यासाठी तिने सासऱ्यांकडे 2 लाख मागितले असता, त्यांनी नकार दिला. सासऱ्यांनी नकार दिला असता मनिषाने त्यांच्या हत्येचा कट आखला. सासऱ्यांसह चोल येथील घरी गेली. तिथे शारिरीक संबंध प्रस्थापित करत असतानाच तिने सासऱ्याच्या गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार केला आणि सासऱ्याला ठार केले. यानंतर घराला टाळं लावून ती निघून गेली. सासऱ्याची हत्या केल्यानंतर काहीच झालं नाही अशा आवेशात ती पुन्हा आपल्या सासरी जाऊन राहू लागली.

दुसरीकडे तीन दिवस झाले तरी जगदीश शर्मा घरी न आल्याने त्यांचं कुटुंब चिंतेत होते. कुटुंब त्यांचा शोध घेत असताना मनिषाही त्यांच्यात सहभागी झाली होती. अखेर चोल येथील घरात त्यांचा मृतदेह आढळला आणि सगळा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी आरोपी सून मनिषा शर्माला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

सुनेला भेटण्यासाठी तिचा प्रियकर उघडपणे घरी येतो अन्…

दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् वहिनीचे आणखी…

प्रेमविवाहाला परवानगी देणाऱ्या सुनेनेच काढला सासऱ्यांचा काटा…

नवऱ्याच्या अनैतिक संबंधावरून कार्यालयातच चपलेने धुलाई…

भावकीमध्ये असलेल्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने घेतला मोठा निर्णय…

The post सूनेचे सासऱ्याशी होते अनैतिक संबंध अन् एक दिवस… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka