Dailyhunt
थरार! समृद्धी महामार्गावरून पोलिसांनी संशयास्पद ट्रकचा पाठलाग सुरू केला अन्.

थरार! समृद्धी महामार्गावरून पोलिसांनी संशयास्पद ट्रकचा पाठलाग सुरू केला अन्.

नागपूर : समृद्धी महामार्गावर एक ट्रक संशयास्पद अवस्थेत प्रवास करत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडल्यानंतर 50 पेक्षा जास्त गाई आढळल्या आहेत. ट्रकचालकासह दोन जण ट्रक सोडून पसार झाले.

पोलिसांनी अज्ञात गो तस्करांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या भागात एक ट्रक रविवारी (ता. २८) दुपारी साडे बाराच्या सुमारास संशयास्पदरीत्या प्रवास करताना पोलिसांना दिसून आला. वर्धा पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केल्याचे ट्रकचालकाच्या लक्षात आल्यानंतर तो वेगाने ट्रक पळवू लागला. पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून ट्रकला थांबवण्याचे प्रयत्न केले. तीन ठिकाणी असलेली नाकाबंदी तोडून तो ट्रक नागपूरच्या दिशेने पळाला. अकोल्यावरून नागपूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या शिवसेनेच्या अकोला जिल्ह्यातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना तो ट्रक दिसला. त्यांनीही त्याचा पाठलाग सुरू केला. अनेक वाहन पाठलाग करत असताना त्या ट्रकने नागपुर जिल्ह्यात प्रवेश करत समृद्धी महामार्ग सोडले.

हिंगणा तालुक्यात एका निर्जन ठिकाणी ट्रक सोडून ट्रकमधील तिघे जण पळून गेले. पोलिसांनी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ट्रकला उघडले तेव्हा त्यामध्ये 50 पेक्षा जास्त गाई अत्यंत दाटी-वाटीने कोंबून बांधण्यात आल्याचे दिसून आले. अत्यंत दाटी-वाटीने बांधल्यामुळे त्यापैकी अनेक गाईंचा मृत्यू झाला होता. तर अनेक गाई गंभीररीत्या जखमी अवस्थेत होत्या. पोलिसांनी अज्ञात गो तस्करांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चालकाला डुलकी लागली अन्…

साईबाबांचे दर्शनानंतर समृद्धी महामार्गावरून जाताना भीषण अपघात…

भांडाफोड! मद्याच्या तस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर…

अपघातानंतर धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा: गृहमंत्री

हिंजवडीमध्ये आयटी अभियंता प्रेयसीची हत्या केली अन् शांतपणे…

The post थरार! समृद्धी महामार्गावरून पोलिसांनी संशयास्पद ट्रकचा पाठलाग सुरू केला अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka