Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तोतया पीएमओ अधिकारी रोहन पारेखला करायचे होते प्रेयसीला 'इंप्रेस'.

तोतया पीएमओ अधिकारी रोहन पारेखला करायचे होते प्रेयसीला 'इंप्रेस'.

मुंबईः पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्याचे (पीएमओ) बनावट ओळखपत्र तयार करून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये संशयास्पदरित्या फिरणारा उच्चशिक्षित आरोपी रोहन पारेख, याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून अगदी हुबेहुब पीएमओ अधिकाऱ्याचे बनावट कार्ड तयार केले होते.

येथील जिओ वर्ल्ड प्लाझात तीन जण घुसले होते. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेला गुंगारा देण्याचा सोमवारी प्रयत्न केला होता. आता या प्रकरणाचे इतर पदर उलगडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. तपासातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

बनावट पीएमओ ओळखपत्र प्रकरणातील आरोपी रोहन पारेख याने घटनेच्या दिवशी जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये तब्बल ७ लाख रुपयांची खरेदी केली होती. खरेदीमध्ये महिलांचे हँडबॅग, वॉलेटसह विविध वस्तूंचा समावेश आहे. क्राइम ब्रँचकडून खरेदीच्या सर्व पावत्या जप्त करण्यात आल्या आहेत.

रोहनने ‘एआय’च्या मदतीने पीएमओचे बनावट ओळखपत्र तयार केल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागातील सूत्रांनुसार, रोहनने घरच्यांना आणि प्रेयसीला इंप्रेस करण्यासाठीच हे केले असावे असा अंदाज आहे. रुबाब आणि दबदबा दाखवण्यासाठी बनावट पीएमओ कार्डचा वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तथापि, नेमका उद्देश काय होता, याचा क्राइम ब्रँचकडून चालू आहे.

केवळ प्रेयसीला खूश करण्यासाठी अथवा तिला इंप्रेस करण्यासाठी त्याने बनावट पीएमओ अधिकारी असल्याचे कार्ड तयार केले का? की त्यांचा काही मोटा कट होता? शासकीय फसवणूक करण्याचा, आर्थिक गैरव्यवहार करण्याचा अथवा सुरक्षा व्यवस्थेलाचा आव्हान देण्याचा त्याचा प्रयत्न होता, यादृष्टीने गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे. त्यातून आता काय धक्कादायक बाबी समोर येतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये तीन व्यक्तींनी पंतप्रधान कार्यालयाचा अधिकारी असल्याचे भासवत, पीएमओ अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखवून शिरकाव केला. त्यानंतर याविषयीची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने याठिकाणी जाऊन खासगी सुरक्षा रक्षक सनी सिंग यांची चौकशी केली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजही गुन्हे शाखेने तपासले. पारेख याच्यासोबत दिलीप कुंदे आणि प्रथमेश बागुल हे सुद्धा असल्याची माहिती समोर आली. रोहनकडे पिस्तूल असल्याची बाब समोर आली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka