Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उपसरपंच अंखड बुडाला होता नर्तिकेच्या प्रेमात; कसा झाला शेवट पाहा.

उपसरपंच अंखड बुडाला होता नर्तिकेच्या प्रेमात; कसा झाला शेवट पाहा.

बीड: गेवराई जिल्ह्यातील लुखामसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय 34) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. ९) समोर आली. याबाबत आता नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे.

बीडच्या पारगाव कला केंद्रात नर्तकी असणाऱ्या पूजा गायकवाड (वय 21) हिच्याशी गेल्या दीड वर्षांपासून गोविंद बर्गे यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये बिनसले होते. पूजा हिने गोविंद बर्गे यांच्याकडून गेवराईतील बंगला नावावर करण्यासाठी तगादा लावला होता. तसे न केल्यास तुमच्यावर बलात्काराची तक्रार दाखल करेन, अशी धमकी पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांना दिली होती.

गोविंद बर्गे यांनी पूजाला पावणेदोन लाख रुपये किंमतीचा मोबाईल घेऊन दिला होता. तसेच तिला अनेक सोन्याचे दागिनेही दिले होते. गोविंद बर्गे हे पूजाच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र, त्याच पूजाने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यानंतर गोविंद यांना वाईट वाटले होते. शिवाय, पूजा हिने गोविंद बर्गे यांच्याशी संपर्क पूर्णपणे तोडला होता. ती गोविंद बर्गे यांच्याशी बोलत नव्हती. त्यामुळे गोविंद बर्गे यांचे मन कशात लागत नव्हते. सोमवारी रात्री ते बार्शी येथील पूजाच्या घरीही गेले होते. बार्शी तालुक्यातील सासुरे गावाजवळ एका चारचाकी गाडीत बर्गे याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.

पोलिसांनी सांगितले की, ‘पूजा गायकवाड हिच्यावर बी एन एस कलम 108 नुसार वैराग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा आणि मृत गोविंद यांच्यात मागील दीड वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती आहे. गावाकडील घर नावावर कर, बार्शीत शेतजामीन घेऊन दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी त्या महिलेने दिली होती. त्या महिलेविरोधात नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.’

प्रेमात वेडा! बार्शीत नर्तिकेच्या घरासमोर माजी उपसरपंचाने केली आत्महत्या; कारण…

प्रेयसीसोबत लॉजवर नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; घाबरून मारली उडी…

दोन लग्न झालेल्या महिलेचे माजी सरपंचासोबत जुळले प्रेमसंबंध अन् पुढे…

पुणे जिल्ह्यातील महिलेच्या खूनाचं गूढ उलगडलं; बिबट्या नव्हे तर उपसरपंच पुतण्या…

The post उपसरपंच अंखड बुडाला होता नर्तिकेच्या प्रेमात; कसा झाला शेवट पाहा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka