Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस अधिकारी येणार अडचणीत.

वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस अधिकारी येणार अडचणीत.

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील राजेंद्र हगवणे आणि इतर आरोपींचे कारनामे समोर येऊ लागले आहेत. वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे आणि त्याचा मोठा भाऊ सुशील हगवणे यांचा आणखी एक कांड समोर आले आहे.

त्यांच्या या कांडमुळे आयपीएस अधिकारी देखील गोत्यात येण्याची शक्यता आहे.

हगवणे कुटुंबाने पुणे पोलिस आयुक्तालयाकडून पिस्तूल परवाना मिळवताना पुण्यातील बनावट पत्ता सादर केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, 2022 मध्ये केवळ एका दिवसात हगवणे कुटुंबातील दोघे आणि त्यांचा सहकारी अशा तिघांना परवाने मिळाले होते. मुळचे भूकुम गावचे असलेले आणि सध्या बावधनमध्ये वास्तव्यास असलेले राजेंद्र हगवणे यांचे कुटुंब, पोलिस नोंदीनुसार, पुणे ग्रामीणच्या पौड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येते. मात्र परवाना मिळवताना त्यांनी पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत असल्याचा भाडेकरार सादर करून पुणेकर असल्याचे भासवले. त्याच पद्धतीने नीलेश चव्हाण यानेही वारजे आणि कोथरूड पोलिस ठाण्यांतर्गत पिस्तूल परवाना घेतल्याचे समोर आले आहे.

शशांक हगवणे, सुशील हगवणे आणि नीलेश चव्हाण या तिघांना 2022 मध्ये एकाच दिवशी परवाने देण्यात आले. शशांक व सुशील हे सख्खे भाऊ असून, त्यांच्या अर्जातही पुण्यातील तात्पुरत्या वास्तव्याचा दाखला देण्यात आला होता. चौकशीत त्यांनी पोलिस यंत्रणेची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत हगवणे कुटुंबाचा एक नातेवाइक त्या काळात पुणे पोलिस दलात कार्यरत होता, अशी माहिती समोर आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका आणि त्यांची निर्णयप्रक्रिया आता तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे.

The post वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस अधिकारी येणार अडचणीत… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka