Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वाईट नजर! वहिनीच्या बेडरूममध्ये घुसला दीर अन् पुढे.

वाईट नजर! वहिनीच्या बेडरूममध्ये घुसला दीर अन् पुढे.

खनौ (उत्तर प्रदेश): माहेरून हुंडा न आणल्यामुळे एका विवाहितेचा छळ केला जात होता. शिवाय, तिचा मोठा दीर तिला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत होता. गाझियाबादमध्ये एका माहिलेने मोठ्या दिराविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

मोठा दीर तिच्याकडे सातत्यानं शरीर संबंधांची मागणी करत होता, असा महिलेने आरोप केला आहे.

माहेरहून हुंड्याचे 10 लाख रुपये आण नाहीतर मला हवं तसं करू दे असे म्हणत महिलेचा दीर तिच्यावर अत्याचार करत होता. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तसेच महिलेची वैद्यकीय तपासणीही केली आहे. वेव सिटी या भागात ही घटना घडली. महिलेने पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, 20 जून 2021 रोजी तिचे लग्न पवन याच्याशी झाले होते. तिच्या वडिलांनी लग्नामध्ये हुंडा दिला. हुंड्यामध्ये कार आणि घरातलं सगळं सामान माहेरहून आणूनही सासरकडून आणखी हुंड्याची मागणी होत होती. ती पूर्ण न झाल्यानं महिलेला त्रास दिला जात होता.

महिलेचा मोठा दीर अरुण याची पहिल्यापासूनच वाईट नजर होती. महिला नेहमी त्याच्याकडे दुर्लक्ष करायची, मात्र 7 ऑगस्ट रोजी महिलेचा पती कामानिमित्तानंे बाहेरगावी गेला असताना तो महिलेच्या खोलीत आला व त्याने तिच्याशी गैरवर्तन केले. महिलेनं विरोध केला असता त्यानं आधी हुंड्याचे 10 लाख रुपये आण नाहीतर जे सुरू आहे ते तसंच सुरू राहू दे अशी धमकी दिली.

मोठ्या दिराची वागणूक पाहून महिलेने नवऱ्याला सांगेन असे त्याला सांगितले. मात्र त्यावर दिराने तिला मारहाण केली. तिने सासरच्या मंडळींना घडलेला प्रकार सांगितला, मात्र त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. पती व सासऱ्यांनी तिच्यावर घाणेरडे आरोप केले. त्यामुळे पीडित महिला माहेरी निघून आली. सासरे बलवीर चंद्र आणि नवरा पवन तिचा सतत छळ करत होते. पोलिसांनी सासरा, पती व मोठ्या दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना लवकरच अटक करू, असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

वहिनी आणि दिराचे प्रेमसंबंध! गरोदरपणात लावले पतीने लग्न…

प्रेम! वहिनीने दिरासोबत काढला पळ अन् पुढे…

वहिनीच्या खोलीत मध्यरात्री घुसताना एकाला दिराने पाहिले अन्…

दीर-वहिनीचे प्रेमसंबंध अन् मृत्यूनंतरही चार महिने 'एक दुजे के लिए'…

दिराने केले विधवा वहिनीसोबत लग्न अन् नको ते घडलं…

दिराच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली वहिनी अन् पुढे तर…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka