नाशिक : नाशिकच्या मालेगाव कॅम्प भागातील साने गुरुजी नगरात अनिकेत बाळासाहेब जगताप (वय 27) या युवकाने आत्महत्या केली आहे. आत्महत्येप्रकरणी कॅम्प पोलिसांनी तपास करत पत्नीसह सासू-सासरे व मामेसासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे
पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, अनिकेतचे वडील बाळासाहेब जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसांनी अनिकेतचा मानसिक छळ केल्याप्रकरणी पत्नी श्रुती जगताप, सासू वंदना सुभाष धिवरे, सासरे सुभाष सुकदेव धिवरे आणि मामे सासू उज्वला सतीश पवार (सर्व रा. पंचशील नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सासू आणि सासरे यांना पोलिसांनी अटक केली असून पत्नी श्रुती आणि मामेसासू उज्वला पवार हे फरार झाले आहेत. श्रुतीला आणि मामे सासूला तत्काळ अटक करा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा मयत अनिकेच्या कुटुंबीयांनी दिला आहे.
अनिकेत जगताप याचा वर्षभरापूर्वी पंचशील नगरातील श्रुती धिवरे हिच्याशी विवाह झाला होता. मात्र, विवाह झाल्यापासूनच दोघांमध्ये सतत वाद होत होते. श्रुती ही नांदायला येत नव्हती तसेच तिने अनिकेतविरुद्ध पोलिसात तक्रार केल्याने तो गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होता. याच त्रासाला कंटाळून अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरात गळफास घेतल्याचा आरोप अनिकेतच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, अनिकेतचे वडील बाळासाहेब जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसांनी अनिकेतचा मानसिक छळ केल्याप्रकरणी पत्नी श्रुती जगताप, सासू वंदना सुभाष धिवरे, सासरे सुभाष सुकदेव धिवरे आणि मामेसासू उज्वला सतीश पवार (सर्व रा. पंचशील नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात पत्नी श्रुती ही त्याच्या पतीला, निरनिराळ्या केस मध्ये अडकवून तुझे हाल करून टाकू, समाजात बदनामी करून टाकू, तू मरून जा, तू काही कामाचा नाही, मला तुझ्यासोबत रहायचे नाही, असे बोलून अनिकेतचा त्याच्या पत्नीने छळ केला. या छळाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. श्रुतीला तत्काळ अटक करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज निकम पुढील तपास करीत आहेत.

