Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Video: 'एसीपी'साठी लाखाची लाच घेणारा अडकला 'एसीबी'च्या जाळ्यात.

Video: 'एसीपी'साठी लाखाची लाच घेणारा अडकला 'एसीबी'च्या जाळ्यात.

पुणे (संदिप कद्रे) : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) मुगुटलाल पाटील यांच्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागून एक लाख रुपये घेताना ओंकार भरत जाधव याला (खासगी व्यक्ती) शनिवारी (ता.

17) पकडण्यात आले. पण, यामुळे एसीपी मुगुटलाल पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ओंकार भरत जाधव (वय ३२, रा. वाकड) याने देहूरोडच्या एसीपींसाठी पुणे येथील एका हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये ही लाच घेतली. एसीपी पाटील यांच्यासाठी त्याने पाच लाख रुपयांची लाच या प्रकरणातील तक्रारदाराकडे मागितली होती. त्यातील एक लाख रुपयांचा पहिला हफ्ता घेताना तो पकडला गेला. एसीबीकडे तक्रार केलेल्या युवकाविरुद्ध कात्रज-कोंढवा बायपास रोड, पुणे येथील एका जागेसंबंधात फसवणुकीचा अर्ज एसीपी मुगुटलाल पाटील यांच्याकडे आला होता. त्याची चौकशी ते करीत होते. त्यात फसवणुकीचा गुन्हा (आयपीसी 420) दाखल न करण्यासाठी जाधवने एसीपी पाटील यांच्या सूचनेवरून पाच लाखांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराने जाधवविरुद्ध दिली होती.

या तक्रारीच्या पडताळणीत आरोपी जाधव याने एसीपी पाटील यांच्याकरता मागितल्याचे दिसून आले. शिवाय, एक लाख रुपयांचा पहिला हफ्ता घेताना त्याला एसीबीचे डीवायएसपी नितीन जाधव, पीआय प्रसाद लोणार, सहाय्यक फौजदार, मुकुंद अयाचित, हवालदार चंद्रकांत जाधव आणि पोलिस शिपाई दिनेश माने या पथकाने काल पकडले. त्याबद्दल त्याच्याविरुद्ध पुण्यातील कोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka