Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Video! पोलिस अधिकारी IPS अमिताभ गुप्ता यांची विशेष मुलाखत.

Video! पोलिस अधिकारी IPS अमिताभ गुप्ता यांची विशेष मुलाखत.

संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.comपुणे शहरचे माजी पोलिस आयुक्त IPS अमिताभ गुप्ता हे पुणे आयुक्तलयाची जबाबदारी पार पाडत असताना ते आरोग्याची सुद्धा तेवढीच काळजी घेत. जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्या चेहऱयावरील तेज, स्मितहास्य सतत पाहायला मिळत होते.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता पोलिस दलात तब्बल ३० वर्षे कार्यरत आहेत. या काळामध्ये विविध जबाबदाऱया पार पाडल्या आहेत. पोलिस दलातील नोकरी म्हटल्यावर ताणतणाव असतोच. शिवाय, झोपेचेही गणित बिघडत असते. पण, काम आणि आरोग्य या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टींकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. कामाच्या ठिकाणी काम आणि आरोग्यासाठी व्यायाम. आरोग्याची काळजी घेतली तरच आयुष्यमान वाढणार आहे. आयुष्य वाढवायचे असेल तर व्यायाम करायलाच हवा. वयोमानानुसारही व्यायामात बदल करता येतो. शाळेत असताना एकत्रीत मैदानी खेळ खेळता येत असल्यामुळे व्यायाम होतो. पण, पुढे जसजसे वय वाढत जाते तसतशा जबाबदाऱया वाढतात. एकट्याला व्यायाम करण्यासारख्याही अनेक गोष्टी आहेत. उदा. पोहणे, सायकलींग करण्यासारखे व्यायाम एकट्यालाही करता येतात. त्यासाठी कोणाची आवश्यकता लागत नाही. व्यायामासाठी कोणतेही कारण पुढे करून चालणार नाही. व्यायाम केला तरच आयुष्य वाढणार, हे लक्षात ठेवून जरी व्यायाम केला तरी खूप झाले. दिवसातील २४ तास काम करणे आणि व्यायाम करणे या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत, हे लक्षात घेतले पाहिजेत, असेही श्री. गुप्ता सांगतात.

पोलिस अधिकाऱ्यांसाठी…
‘पोलिस अधिकारी व्हायचंय?’ या पुस्तकामध्ये आपली मुलाखत प्रसिद्ध करायची असल्यास WhatsApp: 93712 69949 या क्रमांकावर संपर्क साधा. आपली मुलाखत पुस्तक, वेबसाईट आणि व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाईल.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

‘पोलिस अधिकारी व्हायचंय?’ पुस्तक खरेदीसाठी संपर्क:
WhatsApp: 93712 69949
policekaka100@gmail.com

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka