Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Video: पुणे ग्रामीण पोलिस दलाची दमदार कामगिरी.

Video: पुणे ग्रामीण पोलिस दलाची दमदार कामगिरी.

पुणे (संदिप कद्रे): पुणे ग्रामीण पोलिस दलाने दमदार कामगिरी केली असून, कामशेत पोलिसांनी ५६ लाख, ९२ हजार किंमतीचा गांजा जप्त केला आहे.

कामशेत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील यांना २२/०८/२०२४ रोजी सकाळी त्यांचे गोपनीय बातमी दारामार्फत ताजे (ता.

मावळ) गावचे हददीतून जुने हायवेरोडकडून ताजे गावाकडे जाणारे रोडमार्गे मळवली, लोणावळाकडे ४ जण त्यांचे ताब्येतील सिल्हवर रंगाचे वेरना कारमधुन गांजांची वाहतुक करणार असलेची माहिती मिळाली होती. त्यांनी वरीष्ठांना मिळाले बातमीचा आशय सांगून उपविभागीय पोलिस अधिकारी, लोणावळा विभाग यांचे मार्गदर्शना प्रमाणे दोन पथके तयार करून पंचांचे उपस्थितीमध्ये सापळा लावला. त्यानंतर मिळाले बातमीप्रमाणे एक वेरना कार नंबर एम.एच/१४/ जी. वाय / ०५५० हि जुने हायवे रोडणे ताजे गावाकडे आलेली दिसली. त्यावेळी सापळा कारवाईसाठी तयार पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निरीक्षक रविंद्र पाटील यांनी दिले सुचने प्रमाणे छापा घालून कारची व डिकीची पाहणी केली असता डिकीमध्ये एकूण ९८ किलो वजनाचा गांजा हा आंमलीपदार्थ मिळून आला.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

सदर कार मधील
१) अभिषेक अनिल नागवडे, वय २४,
२) प्रदिप नारायण नामदास, वय २५ वर्षे,
३) योगेश रमेशलगड, वय ३२ वर्षे,
४) वैभव संजीवण्न चेडे, वय २३ वर्षे, (सर्व रा. पी.एम.टी. जवळील, मराठी शाळे जवळ, कारेगांवता. शिरूर जि. पुणे) यांना गांजा बाळगले बददल ताब्यात घेवून छाप्यामध्ये मिळुन आलेला एकुण ९८ किलो वजनांचा गांजा एकूण ४८ लाख ५० हजार रूपये किंमतीचा गांजा तसेच ८ लाख रूपये किंमतीची वेरना कार, ४२ हजार रूपये किंमतीचे ३ मोबाईल हॅडसेट असे एकूण ५६ लाख ९२ हजार रूपये किंमतीचा मुददेमाल मिळून आला असून, तो पंचा समक्ष जप्त केला आहे. त्यावरून सदर इसमांवर कामशेत पोलिस स्टेशनला गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम ८ (क) २० (क) अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधिक्षक, रमेश चोपडे, सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील, तसेच पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा फौजदार नितेश कदम, पोलिस अंमलदर. रविंद्र रावळ, जितेंद्र दिक्षित, समिर करे, रविंद्र राय, गणेश तावरे, प्रतिक काळे, गणेश ठाकुर, शिवाजी टकले, सचिन निंबाळकर, पवन डोईफोडे, होमगार्ड सुशिल लोखंडे, रामदास पोटफोडे यांनी कारवाई केली.

Video: …तर लोणावळा येथे अन्सारी कुटुंब बचावले असते

Video: लोणावळा येथे अश्लिल चित्रफीत तयार करणा-या टोळीवर कारवाई; पाहा नावे…

लोणावळा येथे सत्यसाई कार्तिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरूच…

लोणावळा येथे गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तीक यांची कारवाई…

आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka