Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड.

Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड.

पुणे : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड विठ्ठल शेलार याची पोलिसांनी धिंड काढली. पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवत गुन्हेगारांची दहशत कमी करण्यासाठी जिथे लहानाचा मोठा झाला त्याच राहत्या घराच्या परिसरातून त्यांची धिंड काढली.

पिंपरीत धिंड काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयरल झाला आहे.

शरद मोहोळ हत्येतील दुसरा मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलार याचे गाव मुठा गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर उरवडे गाव हे गाव आहे. मुळशी खोऱ्यातील या लहान गावांमध्ये वर्चस्व कोणाचे राहणार यातून निर्माण वादातून शरद मोहोळ याची हत्या झाल्याचे समोर आले आहे. शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणी भाजपशीच संबंधित विठ्ठल शेलारला अटक करण्यात आली आहे. मुळशी तालुक्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी भाजपने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना जवळ केलं. त्यातूनच विठ्ठल शेलारला हत्या, हत्येचा प्रयत्न , खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्ह्यांमधून जामीन मिळत गेले आणि 2017 साली त्याच्यावर मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांची भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी सोपविण्यात आली. तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत शेलारला पक्षात जाहीर प्रवेश देण्यात आला होता.

विठ्ठल शेलार आहे कोण?
विठ्ठल शेलार हा मुळचा मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2014 मध्ये त्याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला अटकही झाली होती. 2017 मध्ये त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर काहीच दिवसांत त्याने भाजपात प्रवेश केला. भाजपने विठ्ठल शेलारवर मुळशी, मावळ आणि भोर तालुक्यांची जबाबदारी सोपवली होती. दरम्यान, विठ्ठल शेलार याच्या भाजप प्रवेशानंतर पक्षावर टीका सुरू झाली.

शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर…

गँगस्टर शरद मोहोळ याचा CCTVसमोरच का केला खून…

मुळशी पॅटर्न! गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येमागची INSIDE STORY…

शरद मोहोळची पत्नी कडाडली; नवरा वाघ होता तर मी वाघीण आहे…

कुख्यात गुंड शरद मोहोळ प्रकरण! पोलिसांनी आवळल्या आठही जणांच्या मुसक्या…

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka