Dailyhunt
विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणारे तिघे अखेर अटकेत.

विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणारे तिघे अखेर अटकेत.

वाराणसी : आयआयटी-बीएचयूच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. गेल्या दोन महिन्यांपासून या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नव्हते. वाराणसी पोलिसांनी अखेर तीन आरोपींना अटक केली आहे.

कुणाल पांडे, आनंद उर्फ ​​अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त केली असून, पुढील तपास करत आहेत. तिन्ही आरोपी पकडल्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. तिन्ही आरोपी हे भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांचे जवळचे असल्याची महिती समोर आली आहे. कुणाल पांडे हा भाजप महानगर युनिटच्या आयटी सेलचा समन्वयक आहे, तर सक्षम पटेल सह-संयोजक आहे. आनंद चौहान हा कँट विधानसभा मतदारसंघातील आयटी सेल समन्वयक आहे. कुणाल पांडे याचा विवाह सराईसर्जन प्रभागाचे नगरसेवक मदन मोहन तिवारी यांच्या मुलीशी गेल्यावर्षी झाला होता. 2022 मध्ये आनंद चौहानविरुद्ध भेलूपूर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हाही दाखल आहे.

आयआयटी-बीएचयूच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर बीएचयूमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पोलिसही शोध घेत होते. अखेर तिघांनाही पकडण्यात यश आले आहे. विद्यार्थिनीने दिलेल्या जबानीत म्हटले आहे की, ‘रात्री दीड वाजता वसतिगृहातून काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडली असताना कॅम्पसच्या गांधी स्मृती चौकाजवळ मित्र भेटला. आम्ही दोघे सोबत जात असताना वाटेत करमन बाबा मंदिरापासून 300 मीटर अंतरावर मागून एक बुलेट आली. त्यावर तीन मुले स्वार होती. त्यांनी मला आणि माझ्या मित्राला दुचाकी उभी करून अडवून गैरवर्तन केले. मी मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली.’

युवतीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल…

धक्कादायक! कुटुंबासमोरच तीन महिलांवर सामूहिक बलात्कार…

बीड हादरलं! चिमुकलीवर पडक्या रूममध्ये सामूहिक बलात्कार…

मणिपूर विवस्त्र धिंड आणि सामूहिक बलात्कार पीडिता कारगील हीरोची पत्नी…

प्रियकरासोबत पुण्यात पळून आलेल्या युवतीवर बलात्कार…

The post विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणारे तिघे अखेर अटकेत… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka