Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
युवतीने फिरायला गेल्यावर होणाऱ्या नवऱ्याच्या लगावली कानशिलात.

युवतीने फिरायला गेल्यावर होणाऱ्या नवऱ्याच्या लगावली कानशिलात.

नैनीताल (उत्तराखंड) : साखरपुडा झाल्यानंतर युवक आणि युवती नैनिताल येथे फिरायला आले होते. यावेळी एका क्षुल्लक कारणावरुन नैनीताल येथील माल रोडवर या जोडप्यामध्ये वाद झाला आणि युवतीने युवकाच्या कानशिलात लगावली.

स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.

हल्द्वानी येथील युवक आणि युवती शनिवारी आपल्या स्कुटीवर नैनीताल फिरायला आले होते. माल रोडवर फोटो काढताना स्कुटीचा स्टँड चुकून युवतीच्या पायाला लागला. यामुळे चिडलेल्या युवतीने थेट युवकाच्या कानशिलात लगावली. सर्वांसमोर कानशिलात खाल्ल्यावर युवकालाही प्रचंड रांग आला आणि त्याने युवतीला मारहाण करण्यास सुरवात केली. रस्त्यावरच दोघे एकमेकांना मारहाण करू लागल्यानंतर स्थानिक नागरिकांना मध्यस्थी केली आणि पोलिसांना माहिती दिली.

पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान समजले की, दोघांचा साखरपुडा झाला असून, तीन महिन्यांनी दोघांचे लग्न होणार आहे. घटनेनंतर दोघांनी आपली चूक मान्य केली आणि भविष्यात अशी घटना करणार नसल्याचे सांगत माफी मागितली. पोलिसांनी दोघांना समजून सांगत घरी पाठवले. पण, या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

साखरपुडा सोहळ्यात खाकी गणवेश परिधान करून आली अन्…

दाजी साखरपुड्यातच पडला मेव्हणीच्या प्रेमात अन् नको ते घडलं…

युवतीने केली 13 दिवसांमध्ये 3 लग्न अन् हनिमूनच्या वेळी…

अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर लग्न करण्यास नकार…

Video: मामीने पळून जात बांधली भाचीशी लग्नगाठ; 3 वर्षांपासून रोमान्स…

एक-दोन नव्हे तर ५० पेक्षा जास्त जणांसोबत महिलेने केले लग्न…

The post युवतीने फिरायला गेल्यावर होणाऱ्या नवऱ्याच्या लगावली कानशिलात… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka