Sunday, 24 Jan, 9.50 am पोलीसनामा

होम
. अन् अवघ्या महाराष्ट्राने अनुभवले उद्धव अन् राज ठाकरे 'बंधु प्रेम'

पोलीसनामा ऑनलाईन - हाच तो क्षण…वेळ सायंकाळी 6 वाजून 23 मिनिट.. मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना एकाच मंचावरुन उपस्थितांचे हात जोडून अभिवादन करताना अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. एकाच मंचावर उपस्थित असलेल्या ठाकरे बंधूंमधील बंधू प्रेम यावेळी उपस्थितांना पाहायला मिळाले. निमित्त होते दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb thackeray jayanti ) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाचे. शिवसेनेकडून मोठ्या जल्लोषात बाळासाहेबांच्या जयंतीचे (Balasaheb thackeray jayanti ) औचित्य साधून पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

या निमित्ताने ठाकरे बंधू ब-याच दिवशांनी एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात मंचावर काही मिनिट बोलण देखील झाले. राज यांच्या हाताच्या दुखापतीबाबत उद्धव यांनी विचारपूस केल्याचे दिसून आले. दोघातील संवादाने यावेळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील महत्वाचे नेते व मंत्री यावेळी उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांचा राज आणि उद्धव ठाकरे यांनी सन्मान केला. यावेळी शशिकांत वडके यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहयला मिळाले.

दक्षिण मुंबईत डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारला आहे. 9 फूट उंचीचा पुतळा, 2 फूट उंच हिरवळ (लँडस्केप), चबुतऱ्यासह 11 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. दोन्ही हात उंचावून जनतेला अभिवादन करतानाची बाळासाहेब ठाकरे यांची चपखल कलाकृती शशिकांत वडके यांनी साकारली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top