Monday, 13 Jul, 1.39 pm पोलीसनामा

होम
'बिग बी' यांच्या प्रकृतीसाठी पाकिस्तानमध्ये प्रार्थना, शोएब अख्तरचे ट्वीट

पोलिसनामा ऑनलाईन टीम - महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे सिनेक्षेत्रात खळबळ उडाली. त्यांनी स्वत: कोरोना झाल्याचे ट्वीटरवरुन सर्वांना सांगितले आहे. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली कळताच, देश-विदेशातून ते लवकर बरे व्हावे यासाठी फॅन्स प्रार्थना करु लागले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर बिग बी लवकरच कोरोनावर मात करुन चाहत्यांसमोर येतील ही सदिच्छा व्यक्त केली.

पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तरनेही अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रार्थना केली. पाकिस्तानातील तुमचे चाहते तुमच्यासाठी प्रार्थना करत आहेत. असे शोएबने म्हटले आहे. शोएब अख्तरने अमिताभ बच्चन यांचे ट्वीट रिट्वीट करत म्हटले की, अमितजी लवकर बरे व्हा. तुम्ही लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना.

बिग बी आणि अभिषेक बच्चन नंतर इतरांचे कोविड 19 टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन या देखील कोविड पॉझिटिव्ह आल्या होत्या. बिग बी आणि अभिषेक बच्चन यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघांमध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणे आहेत, मात्र दोघांचीही प्रकृती ठणठणीत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top