Saturday, 23 Jan, 10.36 pm पोलीसनामा

होम
CM उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे यांच्या संवादानेसगळयांचं लक्ष वेधलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवारी (दि. 23) संपन्न झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ ब-याच दिवसानंतर पुन्हा एकाच कार्यक्रमात दिसून आले. त्यांनी आनंदाने एकमेकांशी साधलेला संवाद सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करीत आहेत. तर सरकारवर टीका करण्याची कोणतीही संधी मनसे सोडत नाही. त्याताच आता महानगरपालिका निवडणूका तोंडावर आल्याने राजकीय टीका टिपण्णीसुद्दा शिवसेना आणि मनसेमध्ये सुरू आहे. परंतु बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळा अनावणाच्या कार्यक्रमात दोन्ही भाऊ आनंदाने संवाद सांधत असल्याचे दिसले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांयकाळी सहा वाजता कार्यक्रमस्थळी पोहचले. त्याआधीच राज ठाकरे तेथे उपस्थित होते. उद्धव ठाकरे येईपर्यंत राज यांचा मंत्री छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात यांच्याशी संवाद झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर सर्वच नेत्यांनी एकत्र झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आगमन झाल्यनंतर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. तसेच राज्यातील सर्वच दिग्गज नेते एका व्यासपीठावर आल्याने महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीतील श्रीमंती सर्वांनी अनुभवली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top