Wednesday, 15 Sep, 8.32 pm पोलीसनामा

होम
Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 4,364 जण 'कोरोना'मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Coronavirus in Maharashtra | राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत आज (बुधवार) घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्याला दिलासा मिळाला आहे. राज्यात आज 3,783 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 4,364 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत 63 लाख 17 हजार 070 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.07 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 56 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 38 हजार 277 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील मृत्यूदर स्थिरावला आहे.

सध्या राज्यात 49 हजार 034 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 63 लाख 61 हजार 089 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 07 हजार 930 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 2 लाख 87 हजार 356 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,926 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Web Titel :- Coronavirus in Maharashtra | In the last 24 hours, 4,364 people have been released from Corona in the state

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Sleeping Tips | झोपेसंबंधी 'या' 5 चुकांमुळे येतंय अकाली वृद्धत्व, तरूण दिसण्यासाठी करा 'ही' सुधारणा; जाणून घ्या

Pune Court | शिवाजीराव भोसले सह. बँकेचं 496 कोटीचं अपहार प्रकरण ! आमदार अनिल भोसले, शैलेश भोसले, मंगलदास बांदल यांच्यासह 'या' 7 जणांविरूध्द कोर्टात 7380 पानी पुरवणी दोषारोप पत्र

Papaya Seeds | पोटातील जंत मारण्यासाठी पपईच्या बिया खाताहेत लोक, तज्ज्ञांनी दिला 'हा' इशारा; जाणून घ्या

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top