Tuesday, 04 Aug, 6.28 pm पोलीसनामा

होम
Coronavirus : केवळ 30 सेकंदात आवाजावरून समजेल 'कोरोना' आहे की नाही ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोना व्हायरसचा कहर अद्यापही वाढतच आहे. आता लवकरच आवाजावरून अवघ्या 30 सेकंदात एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही याची माहिती मिळणार आहे. रुग्णाच्या केवळ आवाजावरून आणि श्वासोच्छावासाच्या गतीवरून कोरोना झाला आहे किंवा नाही हे ओळखणं शक्य आहे का या विषयावर दिल्लीत रिसर्च सुरू आहे. एलएनजेपी रुग्णालयात इस्रायली संशोधकांची एक टीम चाचणी घेत आहे.

दिल्लीत ही चाचणी एलएनजेपी हॉस्पिटलसोबतच राम मनोहर लोहिया रुग्णालयातही सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 10 हजार लोकांवर आता या पद्धतीनं कोरोना चाचणीचा प्रयोग केला जाणार आहे. जर ही चाचणी यशस्वी ठरली तर केवळ 30 सेंकदाच कोरोना झाला की नाही हे समजणार आहे.

एलएनजेपी हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चाचणीत 4 पद्धतींचा समावेश आहे. परंतु यापैकी ब्रिदींग टेस्ट आणि व्हाईस टेस्ट जास्त महत्त्वाची आहे. याशिवाय तर इतरही दोन टेस्ट यात असणार आहेत. येत्या काही दिवसातच या चाचणीचा निकाल हाती येईल. ही चाचणी यशस्वी झाल्यास याचा मोठा फायदा होणार आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, 10 हजार लोकांवर दोनदा ही चाचणी केली जाणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top