Sunday, 24 Jan, 6.51 pm पोलीसनामा

होम
Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात 'कोरोना'चे 135 नवीन रुग्ण, 44 जणांना डिस्चार्ज

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 135 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 44 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (रविवार) शहरामध्ये एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे.

गेल्या 24 तासात शहरामध्ये 135 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 99 हजार 645 वर पोहचली आहे. आज 44 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 96 हजार 169 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

गेल्या 24 तासामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत शहरात 2550 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1794 शहरातील तर 756 पालिका हद्दीबाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 627 रुग्ण ॲक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 85 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 92 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top