Monday, 21 Sep, 12.05 pm पोलीसनामा

ताज्या बातम्या
IPL-13 च्या सामन्यात 'रविचंद्रन अश्विन'सोबत झाला 'अपघात', सोडावं लागलं मैदान

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीग (IPL-13) च्या खेळण्यात आलेल्या रविवारच्या सामन्यात भारतीय क्रिकेट टीमचे सिनिअर ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनसोबत अपघात झाला. अश्विन दिल्ली कॅपिटलच्या वतीने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएल सामना खेळत होते, तेव्हा त्यांना खांद्याला दुखापत झाली. ही दुखापत इतकी धोकादायक होती की पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांना मैदान सोडावे लागले.

दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार श्रेयस अय्यरने अश्विनला सामन्याच्या सहाव्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यास बोलावले. 4.3 ओव्हरमध्ये 30 धावांच्या एकूण स्कोअरवर पंजाबचे कर्णधार केएल राहुल (21) विकेट गमावून बसले होते. अश्विन गोलंदाजीला आले तेव्हा पॉवर प्लेची शेवटची ओव्हर होती.

अश्विनने त्यांच्या करिष्माई फिरकी गोलंदाजीने एकाच ओव्हरमध्ये 2 गडी बाद केले आणि पंजाबला बॅकफूटवर ढकलले. सहाव्या ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर करुण नायर (1) यांना पॅवेलियनमध्ये पाठवले आणि पाचव्या चेंडूवर निकोलस पूरनची विकेट घेतली. शेवटच्या चेंडूवर एक धाव रोखण्याच्या प्रयत्नात अश्विनने डाइव्ह घेतली, ज्यामुळे त्यांच्या खांद्याला दुखापत झाली.

मैदानात वेदनेने विव्हळत असलेल्या अश्विनला दिल्ली कॅपिटलचे फिजिओ पॅट्रिक फरहार्डने पाहिले आणि दुखापतीची तीव्रता पाहता त्यांनी अश्विनला मैदानातून बाहेर नेले. जर अश्विनच्या खांद्याला दुखापत गंभीर राहिल्यास त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागू शकते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ज्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या विरुद्ध ते खेळत होते, ते आयपीएल 2019 मध्ये याच टीमचे कर्णधार होते. यावेळी ते दिल्लीकडून खेळत आहेत.

या सामन्यात अश्विनने केवळ 1 ओव्हर टाकली आणि केवळ 2 धावा देऊन 2 गडी बाद केले. जर अश्विन मैदानाबाहेर गेले नसते तर हा सामना केव्हाच संपला असता. किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने अश्विन गेल्यानंतर विजयासाठी 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये 8 गडी गमावून 157 धावा केल्या आणि सामना टाय झाला.

दिल्ली कॅपिटलचे गोलंदाज मार्कस स्टॉयनीसने अखेरच्या 3 चेंडूत एकही रन न देता 2 गडी बाद केले. यामुळे पंजाबला सामना जिंकता आला नाही. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर विजयासाठी पंजाबला अवघ्या 1 धावेची गरज होती. तथापि, अश्विनने आनंद व्यक्त केला की टीमने 'सुपर ओव्हर' मध्ये 2 गडी राखून हा सामना जिंकला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top