Saturday, 14 Dec, 10.04 pm पोलीसनामा

होम
'ईशान्य भारतातील हिंसाचाराला काँग्रेस 'खतपाणी' घालतंय'

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीत काँग्रेसने 'भारत बचाओ रॅली' काढत भाजपवर हल्लाबोल केला. याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं. नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत सादर झाल्यानंतर ईशान्य भारतात अनेक ठिकाणी त्याविरोधात हिंसक आंदोलनं झाली. परंतू काँग्रेस हिंदू-मुस्लिम राजकारण, नक्षलवाद आणि दहशतवादाला खातपाणी घालत असल्याचा गंभीर आरोप अमित शाहांनी काँग्रेसवर केला.

शाह म्हणाले की आम्ही तिहेरी तलाक कायदा आणला तर काँग्रेसने त्याला मुस्लिमविरोधी म्हटले आणि आता नागरिकत्व दुरुस्ती कायदाही काँग्रेसला मुस्लिमविरोधी वाटत आहे. काँग्रेस ईशान्येत हिंसा भडकवत आहे.

अमित शहांनी काँग्रेसवर आरोप केला की, काँग्रेस पक्ष अनेक वर्षे हिंदू मुस्लिम राजकारण, नक्षलवाद आणि दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम करत आली आहे. दहशतवादासारख्या समस्येला नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान येऊन रोखतो, तेव्हा ते त्यांना वोट बँकेचं राजकारण वाटतं. आम्ही तिहेरी तलाक कायदा आणला, काश्मीरमधून कलम 370 हटवले हे सर्व काँग्रेसला मुस्लिमविरोधी वाटते. आता नागरिकत्व कायदाही मुस्लिमविरोधी असल्याचा कांगावा काँग्रेस करत आहे.

अमित शाह म्हणाले की काँग्रेसची ही जुनी खोड आहे की प्रत्येक गोष्टीला मुस्लिम विरोधी म्हणणं. बांगलादेश, आफगाणिस्तान आणि पाकिस्तान धार्मिक अवहेलना झेलणारे शरणार्थी अनेक वर्षापासून नरक यातनेत जगत आहेत, परंतू काँग्रेस याला मुस्लिमविरोधी म्हणतं. हे विधयेक मुस्लिम विरोधी नाही. सर्वांना मुस्लिमविरोधी म्हणण्याची काँग्रेसला सवयच लागली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top