Sunday, 29 Nov, 7.34 pm पोलीसनामा

होम
झपाट्यानं वजन कमी करायचं असेल तर 'या' 5 घरगुती गोष्टी पडतील उपयोगी, लठ्ठपणामुळं परेशान झाल्यास 'या' गोष्टींचं करा सेवन

पोलीसनामा ऑनलाइन टीम - आज - काल लोक वजन वाढण्याच्या समस्येमुळे सर्वाधिक त्रस्त आहेत. वजन वाढण्याचे कारण काहीही असू शकते. एखाद्या व्यक्तीचे वजन फास्ट फूड खूप खाल्ल्यामुळे वाढू शकते. फास्ट फूड खाल्ल्यामुळे केवळ शरीराचे नुकसान होत नाही तर वजन सुद्धा वाढते आणि एकदा वजन वाढले तर ते कमी करणे खूप अवघड असते.

वजन कमी करण्यासाठी काही घरगुती पदार्थांचा वापर अवश्य करावा. त्यामध्ये काही गोष्टींचा परिचय आम्ही आपणास देत आहोत.

काकडी
काकडी बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध असते. लोक एखाद्या सॅलड सारखे काकडी खाणे पसंत करतात. परंतु काकडी वजन घटण्यामध्ये खूप मदत करते. प्रत्यक्षात काकडीमध्ये 90 टक्के पाणी असते. त्यामुळे भोजन करण्यापूर्वी काकडीचे सेवन करावे त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. या पध्दतीने नियमितपणे काकडी खाल्ल्यास दोन आठवड्यांमध्ये वजन कमी होणे सुरु होईल.

टोमॅटो
टोमॅटो सुद्धा म्हणून सॅलड म्हणून खाल्ले जाते. टोमॅटो सुद्धा वजन कमी करण्यासाठी एक चांगला उपाय आहे. प्रत्यक्षात टोमॅटोमध्ये कॅरोटीन व आयकोटीन असते‌. त्यामुळे वजन नियंत्रित राहते. वजन कमी करण्यासोबतच शरीरामध्ये रक्त वाढण्यासाठी सुद्धा टोमॅटोचा वापर करतात.

लिंबू आणि मध
बाजारांमध्ये सहजपणे उपलब्ध होणारे लिंबू खूप उपयोगी आहे. हे एक चांगले एंटीऑक्सीडेंट औषध आहे‌. त्याच्यामुळे गॅस आणि ॲसिडिटी ही समस्या कमी होते. गरम पाण्यामध्ये लिंबू आणि एक चमचा मध यांचे मिश्रण घेतल्यास वेगाने वजन कमी होते.

पीच
पीच हे फळ उपलब्ध होते विशेषतः शहरांमध्ये. गावांमध्ये ते मिळण्यास थोडी अडचण येते. परंतु जर आपल्याला वजन कमी करण्याची इच्छा असेल तर आपण कुठूनही पीच मागवू शकता. पीच खाल्ल्यास ते वजन वाढू देत नाही. पीच मध्ये फायबर असते हे आतड्यांसाठी खूपच चांगले मानले जाते‌.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top