Tuesday, 20 Apr, 2.23 pm पोलीसनामा

होम
कोरोनाची लागण झालीयं? हॉस्पीटलमध्ये बेड मिळत नाही? मग घरीच 'या' पध्दतीनं घ्या उपचार अन् व्हा लवकर बरे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. मागील २४ तासांत देशात सुमारे २ लाख पन्नास हजाराहून जास्त बाधित सापडले आहे. अनेक राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णसंख्या अधिक आहे. या परिस्थितीत अनेक रुग्णाचे हाल होत आहे. अनेक कोरोना रुग्णांना सध्या रुग्णालयांत बेड मिळत नाहीत. अशी परिस्थिती बिकट झालीय. यावरून आता सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांनी घरीच उपचार करून बरे होऊ शकणार असल्याची महत्वपूर्ण माहिती दिल्लीतील गंगाराम रुग्णालयाचे सल्लागार डॉ. वेद चतुर्वेदी यांनी दिली आहे.

डॉ. वेद चतुर्वेदी यांच्या माहितीनुसार, एखाद्या कोरोना रुग्णाला बेड मिळत नसल्यास त्यानं घरीच राहून स्वत:वर उपचार करावेत. तसेच, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांनी ऑक्सिमीटरच्या माध्यमातून शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासत राहावी. ती ९४ च्या खाली असल्यास पोटावर झोपावं. दिवसातून तीनदा प्रत्येकवेळी २ तास अशा पद्धतीनं झोपावं. तर पोटावर झोपूनही शरीरातील ऑक्सिजन पातळी न वाढल्यास घरी ऑक्सिजन सिलिंडर किंवा ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर मागवावा. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास CT स्कॅन करून घेणे. तसेच, कोरोनातून ठीक होण्यासाठी औषधं आवश्यक आहेत. यामुळे जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. अनेक डॉक्टर सध्या फोनवरून रुग्णांना सल्ला देत आहेत. त्यांची मदत घ्यावी. रुग्णालयात मिळणारी औषधं आयव्ही मार्फत दिली जात आहेत. तीच औषधं गोळ्यांच्या स्वरुपातही घेता येऊ शकतात. असे चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आकाश हेल्थकेअरचे सल्लागार डॉ. विक्रमजीत सिंग म्हणाले, कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना रुग्णालयात जाऊन घेण्याची आवश्यकता नसते, सौम्य, मध्यम स्वरुपाची लक्षणं असलेल्या रुग्णांनी योग्य उपचार घेतल्यास ते घरीच बरे होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, कोरोना रुग्णानं घरी मास्क घालावा. त्याच्या घरातील इतर व्यक्तींनीदेखील मास्क घालावा. घराच्या खिडक्या हवा खेळती राहण्यासाठी त्या खिडक्या उघड्या ठेवाव्या. तर कोरोना रुग्णानं स्वत:जवळ १ ऑक्सिमीटर ठेवावा आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी सातत्यानं तपासावी. ताप आल्यास पॅरासिटीमॉल घ्यावी. भरपूर पाणी प्यावं. तर शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण ८५ टक्क्यांच्या खाली गेल्यास लगेच हॉस्पिटलशी संपर्क साधावा. ऑक्सिजनची पातळी ८५ च्या खाली गेल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधने आवश्यक आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama

related stories

Top