Saturday, 14 Dec, 10.23 pm पोलीसनामा

होम
.म्हणून नेहरुजींनी 'ब्रिटीश' राजाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती, रणजित सावरकरांचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हटले की, माफी मागायला मी काही राहुल सावरकर नाही. विनायक दामोदर सावरकरांबद्दल केलेल्या राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर देशातील राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनीही राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे.

रणजित सावरकर म्हणाले की, 'देश स्वतंत्र होण्याच्या एक वर्ष आधी सत्तेच्या मोहाने नेहरुजींनी व्हाईसराय मंडळाचे सदस्य बनवण्यासाठी भारताचे सम्राट किंग जॉर्ज (6वे) आणि त्यांचे उत्तराधिकारी आणि वंशज यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती' असा आरोप त्यांनी केला आहे.

राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना रणजित सावरकर म्हणाले, 'ही चांगली गोष्ट आहे की, त्यांचे नाव राहुल सावरकर नाही. त्यांचे नाव सावरकर असते, तर आम्हाला तोंड काळे करावे लागले असते. राहुल गांधी यांची आजी इंदिरा गांधी यांचे त्यांच्या नावातून नेहरू काढल्याबद्दल आभार मानले पाहिजेत. कारण त्यांचे आधीचे नाव इंदिरा गांधी-नेहरू होते. देश स्वतंत्र होण्याच्या एक वर्ष आधीच सत्तेच्या मोहाने नेहरुजींनी व्हाईसराय मंडळाचे सदस्य बनण्यासाठी भारताचे सम्राट किंग जॉर्ज (सहावे) आणि त्यांचे उत्तराधिकारी आणि वंशज यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी असं कृत्य घृणास्पद कृत्य करण्याचा स्वप्नातही विचार केला नसता.'

पुढे बोलताना रणजित सावरकर म्हणाले, 'ही गुलामीची शपथ नेहरुजींनी इतक्या निष्ठेने निभावली की, 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा 1950 पर्यंत किंग जॉर्जलाच ते भारताचा सम्राट मानत होते. सर्व महत्त्वपूर्ण निर्णय घेताना ते त्यांची अनुमती घेत होते. मार्च 1948 मध्ये जेव्हा राजाजी यांना गव्हर्नर बनवले तेव्हाही किंग जॉर्ज यांची अनुमती घेतली होती.' असा दावा रणजित यांनी केला.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top