Monday, 25 Jan, 5.52 pm पोलीसनामा

होम
नवी मुंबईत भाजपला झटका, आणखी एक नगरसेविका राष्ट्रवादीत दाखल

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने भाजपला धक्का दिल्यानंतर आता राष्ट्रवादीने भाजपला धक्के पे धक्का द्यायला सुरुवात केली आहे. आता भाजप नगरसेविका तनुजा मढवी यांनी पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत मढवी यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

नवी मुंबईत आतापर्यंत 14 नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे आमदार गणेश नाईकांच्या गडाला जोरदार हादरा बसला आहे. यापूर्वी भाजप नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

उच्च शिक्षित नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा भाजप नगरसेविकेने भाजपला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भाजपचे तीन नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते, दिपा गवते यांनी सेनेत प्रवेश केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या तिन्ही नगरसेवकांनी शिवबंधन बांधले होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top