Saturday, 14 Dec, 10.07 pm पोलीसनामा

होम
फारुख अब्दुल्लांच्या कैदेत आणखी 3 महिन्यांची वाढ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 5 ऑगस्टपासून कैदेत असणारे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरंसचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांची कैद आणखी 3 महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. त्यांच्या निवासस्थानालाच जेल घोषित करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यापासून फारुख अब्दुल्ला कैदेत आहेत. आता त्यांची कैद आणखी 3 महिने वाढवली आहे.

दरम्यान फारुख अब्दुल्ला यांना अवैधरित्या कैद करण्यात आल्याची याचिका एमडीएमके नेते वायको यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. खासदार असणाऱ्या फारुख अब्दुल्ला यांना संसदीय अधिवेशनाला येऊ द्यावं असी मागणीही विरोधकांनी केली होती. दरम्यान जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर आता राज्याचा विशेष दर्जा काढण्यात आला जम्मू काश्मीरचं आता दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आलं आहे.

जम्मू काश्मीरच्या गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीनं फारुख अब्दुल्ला यांच्या कैदेचा आढावा घेतल्यानंतर आता ही कैद वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फारुख अब्दुल्ला यांच्यासोबतच जम्मू काश्मीरचे इतर दोन माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तीही सध्या कैदेत आहेत. 17 सप्टेंबर रोजी फारुख अब्दुल्ला यांच्यावर जनसुरक्षा कायदाही लागू करण्यात आला. या कायद्यांतर्गत कोणत्याही व्यक्तीला सुनावणी न घेताही 3 ते 6 महिने कैदेत ठेवलं जाऊ शकतं.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top