Thursday, 08 Apr, 8.09 pm पोलीसनामा

ताज्या बातम्या
प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप, म्हणाले - 'महाराष्ट्राने 5 लाख डोस वाया घालवले, असे कसे चालेल?'

पोलीसनामा ऑनलाइन टीम - राज्यातील कोरोना लसीच्या तुटवड्यावर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्रात 5 लाख डोस खराब केले आहेत. कारण त्यांना नियोजनच करता आले नाही. एका व्हायलमध्ये दहा डोस असतात. चार-पाच लोक आले त्यांना डोस दिला बाकीचा खराब झाला. असे कसे चालेल. तुम्हाला त्याचे नियोजन करावे लागेल. ठाकरे सरकार आपले काम ठीक करत नाही अन् दुसऱ्यांना दोष देत आहे. मी महाराष्ट्राची पूर्ण माहिती घेतली आहे. तुम्ही अन्य राज्यांची माहिती घ्यावी. राज्यात सध्या 5 ते 6 दिवस पुरेल इतकी लस शिल्लक असल्याचे जावडेकर म्हणाले.

महाराष्ट्रात 23 लाख डोसेस आहेत. दिवसाला जेवढे डोस द्याल त्यापेक्षा जास्त डोस दुस-या दिवशी दिले जातात. आता हे डोस जिल्ह्यांना पाठविणे, तेथून तहसील आणि तहसीलवरून तालुक्यांच्या सरकारी, खासगी हॉस्पिटलला पाठविणे हे केंद्र सरकारचे काम नाही. हे काम राज्य सरकारचे आहे. केंद्र सरकार राज्यांच्या क्षमतेनुसार आजच्यापेक्षा जास्त कोटा देते, असे जावडेकर म्हणाले. दरम्यान राज्यात अनेक जिल्ह्यांत कोरोना लस नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. यावरून गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु झाला आहे. एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप होत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top