Saturday, 25 Sep, 5.26 pm पोलीसनामा

होम
Solapur Accident | सोलापूर-धुळे हायवेवर चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार दुभाजकाला धडकली, 2 ठार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - Solapur Accident | सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगात असणारी कार दुभाजकाला जोरात धडकली. या दुर्घटनेत (Solapur Accident) दोघे जागीच ठार (Died) झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना (शनिवारी) 25 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. दिलीप ज्ञानदेव भोसले (वय, 50), महेंद्र सिताराम गायकवाड (वय, 40) असं मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, दिलीप भोसले (Dilip Bhosale) हे बीडचे शिवअंगणवाडी सेनेचे मराठवाडा प्रमुख आहेत.
त्यांच्या सासुवर अंबाजोगाई रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सासूला भेटण्यासाठी शुक्रवारी दुपारी दिलीप भोसले आणि त्यांचे मित्र महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad)
हे खाजगी गाडीने अंबाजोगाईला गेले होते.
शुक्रवारी रात्री उशिरा अंबाजोगाईहून बीडकडे परतत असताना त्याची कार सोलापूर-धुळे महामार्गावरील (Solapur-Dhule Highway) बायपास चौकालगत आल्यावर वाहन
चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकाला (Solapur Accident) धडकली.

दरम्यान, या अपघातात (accident) दिलीप भोसले, महेंद्र गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रकांत कांबळे हे जखमी झाले असून त्याच्यांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर, बीड जिल्ह्यातील सामाजिक चळवळीतील दिलीप भोसले याचं बीड जिल्ह्यात नाव आहे.
त्यांचा अपघाती निधन झाल्याने परिसरात नागरिकांत दुख व्यक्त होत आहे.

Web Title : Solapur Accident | 2 killed as driver hits car divider on Solapur-Dhule highway

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Corporation | महापालिकेत 3 कोटीचा अपहार झाल्याचा शिवसेनेच्या नीलेश गिरमेंचा आरोप, म्हणाले - संबंधितांवर गुन्हे दाखल करा'

Multibagger Stock | 21.49 रुपयांचा स्टॉक झाला 343.5 चा, तीन महिन्यात 1 लाखाचे झाले 15.98 लाख रुपये; तुमच्याकडे आहे का?

Dombivli Gang Rape Case | डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण ! आरोपींकडून अनेकदा कंडोमऐवजी प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top