Sunday, 17 Jan, 7.50 pm पोलीसनामा

होम
सोनू निगमचे गुरु उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन

मुंबई : 2021 च्या सुरुवातीला संगीत जगतासाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे. महान शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. त्यांची स्नूषा नम्रता गुप्ता खान यांनी ही दु:खद माहिती दिली. उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहेब यांनी आपल्या विशाल करियरदरम्यान आपल्या आवाजाच्या जादूने सर्वांना मंत्रमुग्ध केले आणि सूरांमध्ये बांधून ठेवले. जे सूख उस्ताद खान साहेब यांना लाइव्ह ऐकायला मिळत होते ते आता कधीही मिळणार नाही. मात्र यातही काही शंका नाही की आपल्या पाठीमागे जो वारसा गुलाम मुस्तफा खान सोडून गेले आहेत तो ऐकून श्रोते संगीताच्या आत्मीयतेसोबत मोठ्या कालावधीपर्यंत राहतील.

गुलाम मुस्तफा खान यांच्या स्नूषा नम्रता गुप्ता यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, खान साहेब यांनी रात्री 12.37 मिनिटांनी बांद्रा येथील निवास्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी म्हटले - आज सकाळी ते ठिक होते. आमच्या येथे 24 तास नर्स त्यांची काळजी घेत होती. पण मसाजच्या दरम्यान ते वॉमिट करू लागले. मी धावत आले आणि मी पाहिले की त्यांचे डोळे बंद आहेत आणि ते हळुहळु श्वास घेत होते. मी डॉक्टरांना बोलावले परंतु तोपर्यंत त्यांनी शरीर सोडले होते. संपूर्ण कुटूंबाला या वृत्ताने धक्का बसला आहे. जर ते जीवंत राहिले असते तर 3 मार्चला आपल्या आयुष्याची 90वर्ष पूर्ण केली असती. सोशल मीडियावर सुद्धा नम्रता यांनी याबाबत माहिती दिली.

लता मंगेशकर यांनी व्यक्त केले दु:ख
आज सायंकाळी त्यांच्यावर सांताक्रुज कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचा जन्म 3 मार्च, 1931 ला उत्तर प्रदेशच्या बंदायूमध्ये झाला होता. खान, आपल्या कुटुंबात चार भाऊ आणि तीन बहिणींमध्ये सर्वात मोठे होते. त्यांनी आपले वडील उस्ताद वारिस हुसैन खान यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले होते. नंतर त्यांनी आपले काका उस्ताद निसार हुसैन खान यांच्याकडून सुद्धा संगीतातील बारकावे शिकून घेतले. त्यांना 1991 मध्ये पद्मश्री, 2006 मध्ये पद्म भूषण आणि 2018 ला पद्म विभूषणने सन्मानित करण्यात आले. ते गायक सोनू निगम यांचे गुरु होते.

त्यांच्या निधनावर लता मंगेशकर, उस्ताद अमजद अली खान आणि ए. आर. रहमान यांनी दु:ख व्यक्त केले आहे. लता मंगेशकर यांनी लिहिले - मला आत्ताच ही बातमी मिळाली की, महान शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन झाले. हे ऐकुन खुप दु:ख झाले. ते गायक तर खुप चांगले होतेच पण माणूस म्हणूनही खुप चांगले होते. ए. आर. रहमानने सुद्धा ट्विट करत लिहिले - सर्व गुरुंमध्ये सर्वात आवडते. अल्लाहने त्यांना दुसर्‍या जगात खास जागा द्यावी.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top