Saturday, 20 Jul, 7.31 am पोलीसनामा

विश्व कप 201 9
वर्ल्डकप फायनल मॅचच्या निकालाबाबत इंग्लंडचा कॅप्टन मॉर्गनचं 'धक्‍कादायक' वक्‍तव्य !

पोलीसनामा ऑनलाईन टीम - वर्ल्डकप २०१९ मधील अंतिम सामना फारच रोमांचक झाला. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड अशा झालेल्या या सामन्यात सुपरओव्हर खेळवायला लागली. अखेर या अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. इंग्लंडच्या या विजयानंतर आता इंग्लंडचा कर्णधार ईयान माॅर्गनने म्हटले की, या सामन्याचा निर्णय अशाप्रकारे यायला नाही पाहिजे होता. हा सामना इतका रोमांचक झाला की शेवटपर्यंत या सामन्याचा निकाल काय असेल हे कोणीच सांगू शकत नव्हते. मॉर्गन आपल्या स्पष्ट विचारासाठी ओळखला जातो.

अंतिम सामन्याच्या निकालावर अनेक माजी खेळाडूंनी जोरदार टीका केली होती. सुपरओव्हरमध्ये देखील सामना टाय झाल्यानंतर आयसीसीच्या नियमानुसार ज्या संघाने सामन्यात सर्वाधिक चौकार मारले आहेत तो संघ विजयी असेल. या नियमाचा फायदा इंग्लंडला झाला. या नियमावरच माजी खेळाडूंनी खूप टीका केली. सचिन तेंडुलकरने म्हटले की, या सामन्याचा निकाल सुपर ओव्हर खेळवून काढायला पाहिजे होता.

मॉर्गनच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप इंग्लंडने जिंकला असला तरी आयसीसीच्या नियमामुळे हा सामना बराच वादग्रस्त ठरला. या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज स्टोक्सच्या बॅटला चेंडू लागून सीमापार गेला आणि तिथेच सामन्याचे पारडे इंग्लंडच्या बाजूने झुकले. या ठिकाणी इंग्लंडच्या संघाला सहा धावा मिळाल्या परंतु नंतर या सहा धावा देखील वादग्रस्त ठरल्या.

  • वजन कमी करण्‍याचा 'गोड' उपाय ! एकदा करून बघाच
  • नारळ 'इतक्या' आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या
  • 'सेक्स लाईफ' सोबत अनेक आजारांवर कांदा उपयुक्त, जाणून घ्या
  • 'या' लोकांनी जिरा पाणी पिणे टाळा
  • रोज भिजवलेले मनुके खाण्याचे ५ फायदे ; जाणून घ्या
  • महिलांनी 'या' खास दिवसांमध्ये खाऊ नये पपई, कारण जाणून घ्या
  • चेहरा होतो उजळ, दररोज 'हे' केल्याने होतात मोठे फायदे
  • पावसाळ्यात फूड पॉयझनिंग झाल्यास करा 'हे' रामबाण घरगुती उपाय
  • कमी झोप घेतल्यास होऊ शकतात 'हे' आजार, जाणून घ्या
  • वजन कमी करण्यासाठी महत्त्वाच्या 'या' १३ खास टीप्स
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top