Tuesday, 07 Jul, 4.52 pm पोलीसनामा

होम
'या' 5 सवयीमुळं सकाळी उठल्यानंतर पोट साफ होत नाही, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम - आपण सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात करत असताना शौचास जाऊन करतो. मात्र, अनेक लोक असे आहेत ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहा, कॉफी, तंबाखू अथवा सिगारेटचं सेवन करावं लागत. कारण पोट चांगलं साफ होईल. तसेच काहीजण पोट साफ होण्याकरता रात्री चूर्ण खाऊन झोपतात. तर काहीजण औषध घेतात.

या समस्येला बद्धकोष्टता असं म्हटलं जात. ही समस्या गॅसमुळे होते. रोजच्या काही क्षुल्लक चुकांमुळे तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे आज आम्ही आपणास या सवयींबाबत सांगणार आहे. ज्यामुळे तुम्हाला पोट साफ न होण्याची समस्या पुन्हा होणार नाही.

१. रात्री उशिरापर्यंत जागणं

अलीकडे अनेकजण वेळेवर न झोपता रात्री उशिरा झोपून सकाळी उशिरा उठतात. त्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. बॉडी क्लॉक बिघडतं म्हणून पोट साफ होण्यास त्रास होतो.

२. व्यायाम न करणे

सध्याच्या व्यस्त जीवशैलीत वेळेचा अभाव जाणवतो. म्हणून लोकांची शारीरिक हालचाल जास्त होत नसल्याने पचनशक्ती मंदावते. त्यामुळे सुद्धा सकाळी उठल्यानंतर पोट साफ होत नाही.

३. धूम्रपान करणं

अलीकडे धूम्रपान करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धूम्रपान केल्याने फक्त फुफ्फुस खराब होत नसून पचनशक्तीवर देखील परिणाम होतो. म्हणून पोट साफ होण्यास अडचण येत.

४. कमी पाणी पिणं

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याची आवश्यकता लागते. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा कमी पाणी पिता तेव्हा स्टूल हार्डची समस्या उद्भवते. परिणामी मुळव्याधाची बाधा देखील होऊ शकते. त्यामुळे दररोज ८ ते १० ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. तसेच ही समस्या टाळण्यासाठी रोज सकाळी उठल्यानंतर गरम पाण्याचे सेवन करा. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.

५. सकाळी नाष्ता न करणं

काहीजण सकाळी नाष्त्यामध्ये चहा, कॉफी ब्रेड बटर असे पदार्थ खातात. त्यामुळे आपणास न कळता आपल्या आरोग्याचं मोठं नुकसान होतं. तुम्हाला जर पोट साफ होण्याच्या समस्येपासून वाचायचं असेल तर सकाळी हेल्दी नाष्ता करायला हवा. आहाराचं प्रोटिन्स, फायबर्सने परिपूर्ण असलेल्या पदार्थाचा समावेश करावा. तसेच उघड्यावरचे पदार्थ, पॅक्ड फूड, जास्त तेलकट, गोड पदार्थ खाण्याचे टाळा.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top