Dailyhunt
आघाडीत बिघाडी; देसाई, परब, नार्वेकर सपकाळांच्या भेटीला, शिष्टाई फळास येणार?

आघाडीत बिघाडी; देसाई, परब, नार्वेकर सपकाळांच्या भेटीला, शिष्टाई फळास येणार?

मुंबई : महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबदास दानवे यांची उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नाराज होते.

त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता ठाकरे गटाचे एक शिष्टमंडळ सपकाळांच्या भेटीसाठी गेले आहेत. या शिष्टमंडळाची शिष्टाई फळाला येऊन, काँग्रेसची नाराजी दूर होईल का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर आणि स्वत: विधानपरिषदेचे उमेदवार अंबादास दानवे आणि इतर नेते यांचे शिष्टमंडळ आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या भेटीला पोहचले आहे. अगदी काही वेळातच दानवे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र त्यापूर्वी ठाकरेंचे शिष्टमंडळ काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

सपकाळांची नाराजी?

हर्षवर्धन सपकाळ माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले, "एकंदरीत महाविकास आघाडी म्हणून काही निर्णय होतात, त्याची एक पद्धत असते. त्या पद्धतीचा अवलंब होऊन, सर्व निर्णय होणे अपेक्षित आहे. मात्र दानवेंच्या उमेदवारीत ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्याचप्रमाणे आगामी काळात ज्या निवडणुका होणार आहेत, त्या संदर्भात भूमिका आणि धोरण आताच ठरवणं गरजेचं आहे."

Related

मुंबई : महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबदास दानवे यांची उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता ठाकरे गटाचे एक शिष्टमंडळ सपकाळांच्या भेटीसाठी गेले आहेत. या शिष्टमंडळाची शिष्टाई फळाला येऊन, काँग्रेसची नाराजी दूर होईल का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सपकाळांची नाराजी?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra