Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Abhijit Dipke News : अभिजीत दिपकेंच्या हाती भगवा देण्यासाठी दोन्ही शिवसेनेत चढाओढ; राजकारणात एन्ट्री करणार?

Abhijit Dipke News : अभिजीत दिपकेंच्या हाती भगवा देण्यासाठी दोन्ही शिवसेनेत चढाओढ; राजकारणात एन्ट्री करणार?

Abhijit Dipke News : अभिजीत दिपकेसारखा एक युवांचा नेता आपल्यासोबत असावा असं सर्वच पक्षांना वाटतं. दोन्हीही शिवसेनेकडून दिपके यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी मोठी चढाओढ लागली आहे.

छत्रपती संभाजीनगर (चेतन झडपे) : कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक आणि जंतर मंतर येथे आंदोलन करुन केंद्र सरकारला घुडघ्यावर आणणारा अभिजीत दिपके आता जेन झी तरुणाईचा नायक झाला आहे.

आता हे युवा नेतृत्व आपल्यासोबत असावं, यासाठी दोन्ही शिवसेनेत रस्सीखेच सुरु झाली आहे. सर्वप्रथम याची सुरुवात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून झाली. दिपकेंच्या आंदोलनाला ठाकरेंनी भेट दिली होती. दीपकेंच्या समर्थनार्थ ठाकरे पक्षाकडून आंदोलनही करण्यात आलं. ठाकरेंची हीच जवळीकता पाहून शिंदेंची शिवसेनाही पुढे सरसावली आहे.

एकनाथ शिंदें यांच्या शिवसेनेचे नेते व राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपके यांचं आंदोलन झाल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन भेच घेतली होती. शिरसाटांनी दिपके कुटुंबियांची भेट घेत ते नातेवाईक असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे शिवसेनेचे विधानपरिषदेवरील आमदार बच्चू कडू यांनीही दिपकेंची भेट घएतली आहे. कडू यांनी दिपकेंना पेढा ही भरवला आहे. ठाकरेंचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिपकेंची घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे दिपके यांना आपल्या पक्षात ओढण्यासाठी दोन्ही शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरु झाली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

सुरुवातील राज्यातून सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. ठाकरेंनी इतर पक्षांनाही दिपके यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. तर दुसरीकडे आंदोलन सुरु असताना शिंदेंच्या शिवसेनेने या आंदोलनाला पाठिंबा दिलेला नव्हता, मात्र आंदोलन यशस्वी झाल्यानंतर शिंदे शिवसेनेचे बडे नेते अभिजित दिपकेंना भेट घेण्यास आले होते.

दिपके राजकारणात येणार का?

अभिजीत दिपके हे भविष्यात राजकारणात येणार का? याबाबत अद्याप काही स्पष्टता नसली तरी अभिजीत दिपकेसारखा एक युवांचा नेता आपल्यासोबत असावा असं सर्वच पक्षांना वाटतं. दोन्हीही शिवसेनेकडून दिपके यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी मोठी चढाओढ लागली आहे. यासाठी शिंदे आणि ठाकरेंचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.


Related

छत्रपती संभाजीनगर (चेतन झडपे) : कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक आणि जंतर मंतर येथे आंदोलन करुन केंद्र सरकारला घुडघ्यावर आणणारा अभिजीत दिपके आता जेन झी तरुणाईचा नायक झाला आहे. आता हे युवा नेतृत्व आपल्यासोबत असावं, यासाठी दोन्ही शिवसेनेत रस्सीखेच सुरु झाली आहे. सर्वप्रथम याची सुरुवात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून झाली. दिपकेंच्या आंदोलनाला ठाकरेंनी भेट दिली होती. दीपकेंच्या समर्थनार्थ ठाकरे पक्षाकडून आंदोलनही करण्यात आलं. ठाकरेंची हीच जवळीकता पाहून शिंदेंची शिवसेनाही पुढे सरसावली आहे.

दिपके राजकारणात येणार का?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra