Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Abhijit Dipke News : अभिजीत दिपकेंना अटक करा, तो पाकिस्तानी एजंट; दिल्ली पोलिसात एफआयआर दाखल!

Abhijit Dipke News : अभिजीत दिपकेंना अटक करा, तो पाकिस्तानी एजंट; दिल्ली पोलिसात एफआयआर दाखल!

Abhijit Dipke News : डीसीपी कार्यालयाबाहेर तक्रारीची प्रत दाखवत फैजान अन्सारी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. "आज मी अभिजीत दीपके यांच्या विरोधात डीसीपींकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी दीपके यांच्या विरोधात एफआयआर नोंदवून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. फैजानने दीपके यांना पाकिस्तानी एजंट आणि उमर खालिदचे समर्थक असल्याचे म्हंटले आहे, तसेच एका मीडिया संवादादरम्यान आपल्यावर हल्ला केल्याचा आरोपही केला त्यांनी केला आहे. दिपके यांना अटक न केल्यास ते देशात दंगली भडकवू शकतात, असा ही खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

डीसीपी कार्यालयाबाहेर तक्रारीची प्रत दाखवत फैजान अन्सारी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. "आज मी अभिजीत दीपके यांच्या विरोधात डीसीपींकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या माणसांनी माझ्यावर दोनदा हल्ला केल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. माझ्यावर पुणे आणि औरंगाबाद येथे हल्ला झाला. मी तिथेही दोन गुन्हे दाखल केले आहेत आणि दीपके यांना तात्काळ अटक करावी, अशी माझी मागणी आहे." दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पोलिसांना सलाम करत फैजान म्हणाला की, सोनम वांगचुकला योग्य वेळी अटक करण्यात आली, ज्यामुळे दिल्लीतील परिस्थिती अधिक बिघडण्यापासून वाचली. दिपके प्रत्येक गोष्टीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत आहे."

दिपके हा उमर खालिदचा समर्थक आणि पाकिस्तानी एजंट ?

फैजानने डीसीपी कार्यालयात सादर केलेल्या लेखी तक्रारीत सीजेपीच्या संस्थापकाला पाकिस्तानी एजंट आणि उमर खालिदचा समर्थक म्हटले आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, "अभिजीत हा पाकिस्तानी एजंट, उमर खालिदचा समर्थक आहे, ज्याने म्हटले होते, 'भारत तेरे तुकडे होंगे.' अभिजीत दिपकने जंतर मंतरवर बॉलिवूड सेलिब्रिटींना पैसेही दिले होते." फैजानने सांगितले की, तो दीपकेबद्दल तक्रार करण्यासाठी मुंबईहून दिल्लीला आला होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी अद्याप या तक्रारीवर प्रतिसाद दिलेला नाही.

फैजानने दावा केला की, जावेदला एक लाख रुपये आणि पूनम पांडेला २०,००० रुपये मिळाले. त्या इन्फ्लुएन्सरने उमर खालिदप्रमाणेच अभिजीत दीपकेला तुरुंगात टाकण्याची मागणी केली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सरन्यायाधीशांच्या महिनाभर चाललेल्या जंतर - मंतर आंदोलनात अनेक सेलिब्रिटींनीही सहभाग घेतला होता. अभिजीत दीपक देशाचे वातावरण खराब करत असून, त्याला थांबवले नाही तर तो भारतात दंगली भडकवेल, असे म्हणत त्याने तात्काळ एफआयआर नोंदवण्याची मागणी केली.


Related

Abhijit Dipke News : डीसीपी कार्यालयाबाहेर तक्रारीची प्रत दाखवत फैजान अन्सारी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. "आज मी अभिजीत दीपके यांच्या विरोधात डीसीपींकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

दिपके हा उमर खालिदचा समर्थक आणि पाकिस्तानी एजंट ?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra