मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी उद्यापासून आपण रखरखत्या उन्हात आंदोलन करणार असल्याचे सांगत राज्य सरकारला इशारा दिला आहे. यामुळे आता सरकारचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे.
आमदार प्रसाद लाड हे सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आणि हे आंदोलन थांबवण्यासाठी गेले होते, मात्र या शिष्टाई यश आले नाही. जरांगे यांनी कडक आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दरम्यान यावर आता महायुतीच्या नेत्यांकडून टीका टिप्पण्णी सुरु झाली आहे. भाजपचे आमदार अमित साटम यांनी जरांगेबाबत मोठा दावा केला आहे. साटम म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी जरांगेनी आंदोलन जाहीर केलं आहे. सुर्यावर थुंकल्याने काही होत नाही, अशा शब्दात देखील साटम यांनी जरांगेना सुनावले आहे. हे आंदोलन मराठा समाजासाठी नाही, असाही आरोप साटम यांनी केला आहे.
साटम नेमके काय म्हणाले?
जरांगेचे आंदोलन हे मराठा समाजासाठी नसून, हे आंदोलन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केवळ टार्गेट करण्यासाठी हे आंदोलन आहे. त्यामुळे एक कोणतीही व्यक्ती अशा प्रकारे मराठा समाजाचा नेता होऊ शकत नाही. सुर्यावरती थुंकल्याने सुर्याला काही फरक पडत नसतो. ती थुंकी आपल्यावर पुन्हा येत असते. एवढं जरांगेंनी लक्षात ठेवावं.
Related
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी उद्यापासून आपण रखरखत्या उन्हात आंदोलन करणार असल्याचे सांगत राज्य सरकारला इशारा दिला आहे. यामुळे आता सरकारचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे. आमदार प्रसाद लाड हे सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आणि हे आंदोलन थांबवण्यासाठी गेले होते, मात्र या शिष्टाई यश आले नाही. जरांगे यांनी कडक आंदोलनाचा इशारा दिला आहे.
साटम नेमके काय म्हणाले?

