Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Asiatic Society Election : एशयाटीक सोसायटी निवडणूक : कुमार केतकरांचा मोठ्या फरकाने पराभव, अध्यक्षपदी भाजपचे सहस्रबुद्धे!

Asiatic Society Election : एशयाटीक सोसायटी निवडणूक : कुमार केतकरांचा मोठ्या फरकाने पराभव, अध्यक्षपदी भाजपचे सहस्रबुद्धे!

Asiatic Society Election Mumbai News : द एशियाटिक सोसायटी मुंबईच्या निवडणुकीत कुमार केतकर यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला आहे.

मुंबई (चेतन झडपे) : मागील काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असलेल्या 'द एशियाटिक सोसायटी मुंबई' निवडणुकीचा अखेर निकाल लागला समोर आला आहे.

या निवडणुकीत माजी खासदार कुमार केतकर यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. तर भाजप नेते विनय सहस्रबुद्धे यांनी अध्यक्षपदाची निवडणूक खिशात टाकली आहे. सहस्रबुद्धे यांच्या 'एशयाटीक टुमारो' पॅनेलने दणदणीत विजय खेचून आणला आहे.

द एशियाटिक सोसायटी मुंबईच्या निवडणुकीत कुमार केतकर यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विनय सहस्रबुद्धे यांना 349 मते मिळाली, तर केतकर यांना केवळ 157 मतेच घेता आली. या निकालात केतकर यांच्या संपूर्ण पॅनेलचा पराभव झाला आहे.

पॅनलमध्ये कोणाकोणाचा विजय?

अध्यक्षपदी विनय सहस्रबुद्धे, उपाध्यक्षपदी चंद्रप्रकाश द्विवेदी, नीतीश भारद्वाज, रमेश पतंगे आणि संजय देशमुख या सर्वांचा विजय झाला आहे. तर मानद सचिव म्हणजेच ऑननरी सेक्रेटरी पदावर विवेक गणपुळे यांनी विजय संपादन केले आहे.

व्यवस्थापन समितीच्या सहा सदसयपदांवर माधव भंडारी, मल्हार कुलकर्णी, प्राची मोघे, प्रमोद बापट, राजेश बेहरे आणि व्ही एम चक्रवर्ती यांचा विजय झाला आहे.

त्याचप्रमाणे स्क्रुटीनायझिंग समितीच्या सात जागांवर अभिजीत मुळ्ये, उमंग काळे, माधवी नरसाळे, मल्हार गोखले, अमोल जाधव, दत्तात्रय पंचवाघ, स्नेहा नगरकर यांचाही विजय झाला आहे.

मतदार नोंदणीवरून वाद -

एशियाटिक सोसायटीची ही निवडणूक दोन्ही पॅनलसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. यात विशेष बाब म्हणजे नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांना मतदानाचा अधिकार देण्यावरून दोन्ही पक्षाकडून मोठा वाद घडून आला होता. सुरूवातीला हा वाद धर्मादाय आयुक्तांकडे पोहचला, मात्र त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहचले होते. न्यायालयीन हस्तक्षेपानंतर शनिवार 4 एप्रिलला शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली.

मतदानाचे प्रमाण अत्यल्प -

एशियाटिक निवडणूकीत एकूण मतदारांची संख्या 2530 एवढी होती. मात्र प्रत्यक्षात 517 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शनिवारी सकाळी 10 ते 04 वाजेपर्यंत मतदान शांततेत पार पडले. दोन्ही पॅनेलने निवडणूक प्रतिष्ठेची केली असली तरी, पावसामुळे मतदान कमी झाल्याचे सांगण्यात येते.


Related

मुंबई (चेतन झडपे) : मागील काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असलेल्या 'द एशियाटिक सोसायटी मुंबई' निवडणुकीचा अखेर निकाल लागला समोर आला आहे. या निवडणुकीत माजी खासदार कुमार केतकर यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. तर भाजप नेते विनय सहस्रबुद्धे यांनी अध्यक्षपदाची निवडणूक खिशात टाकली आहे. सहस्रबुद्धे यांच्या 'एशयाटीक टुमारो' पॅनेलने दणदणीत विजय खेचून आणला आहे.

पॅनलमध्ये कोणाकोणाचा विजय?

मतदार नोंदणीवरून वाद -

मतदानाचे प्रमाण अत्यल्प -

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra