Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Baburao Chandere News : नागरीकांना धमकीची भाषा वापरत दमदाटी केली. मात्र नागरीकांनी आक्रमक होऊन विरोध वाढवल्यानंतर चांदेरे यांनी येथून पळ काढल्याचे दिसून आले.

Baburao Chandere News : नागरीकांना धमकीची भाषा वापरत दमदाटी केली. मात्र नागरीकांनी आक्रमक होऊन विरोध वाढवल्यानंतर चांदेरे यांनी येथून पळ काढल्याचे दिसून आले.

Baburao Chandere News : सूस आणि महाळुंगे ही दोन गावे पालिकेत समाविष्ट झाली खरी मात्र या ठिकाणी कोणत्याही रस्त्याचे कामे झाले नसल्याची वस्तुस्थिती आहे.

पुणे : पावसाळा सुरु झाल्यापासून पुण्यातील अनेक भागांमध्ये रस्त्याचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पुण्यात चांगले रस्ते कमी आणि खड्ड्यांचे साम्राज्य जास्त अशीच एकूण परिस्थिती आहे. यामध्ये पुण्यातील स्मार्ट सिटी म्हणून ओळखला जाणारा भाग असणारा राधा चौक ते महाळुंगे हा रस्ता संपूर्णतः खड्डेमय झाला आहे. आणि त्या विरोधातच आज महाळुंगे ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरत जोरदार आंदोलन केलं. मात्र नागरिकांना जबाबदारी स्वीकारून उत्तर देण्याऐवजी राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक बाबुराव चांदेरे थेट धमकीच दिली. त्यामुळे नेहमीच हाणामारी, शिवीगाळ आणि भर रस्त्यावर वाद घालण्यासाठी कुप्रसिद्ध असणारे नगरसेवक बाबुराव चांदेरे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

सूस आणि महाळुंगे ही दोन गावे पालिकेत समाविष्ट झाली खरी मात्र या ठिकाणी कोणत्याही रस्त्याचे कामे झाले नसल्याची वस्तुस्थिती आहे. याच विरोधात नागरिकांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला स्थानिक ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. हे पाहून पुणे पालिकेचे अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी पोहचले. जमलेल्या ग्रामस्थांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना कामे का केली जात नाही, असा सवाल विचारला. नागरिक आक्रमक झालेले असताना येथे नगरसेवक बाबूराव चांदेरे पोहचले. आक्रमक झालेले ग्रामस्थ पाहून चांदेरे यांनी अधिकाऱ्यांच्या हातातील माईकचा ताबा घेतला आणि स्वत; बोलायला लागले. मात्र नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी बाबुराव चांदेरे यांनी थेट दादागिरीची भाषा सुरू केली.

या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी आहेत. ते तुमच्या समोर काही बोलू शकत नाहीत. मी जर बोलायला लागलो ना, एक एक जण मागे निघून जाल. तुम्ही काय सांगता मला? तुम्हाला काय कळतं? अशी अरेतुरेची भाषा चांदेरे यांनी वापरली. नगरसेवक महाशय इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी थेट एका तरुणाला तुझ्या आईला मी सरपंच केलं होत मी सगळं लक्षात ठेवतो मी पाहून घेईल अशी उघड धमकीच दिली.

बाबुराव चांदेरे यांची ही धमकी ऐकताच उपस्थित नागरिकांनी सुद्धा त्यांना त्याच भाषेत सुलवलं. आम्ही रस्त्याचा प्रश्न विचारात आहोत तुम्ही बघून घ्यायची भाषा करत आहात तुम्हाला काय बघून घ्यायचं ते बघून घ्याच असं म्हणत नागरिकांनी चांदेरे यांना चांगलच सुनावलं. हे वातावरण फारच चिघळले. नागरिकांचा आक्रमक पवित्रा पाहून बाबुराव चांदेरे यांनी आंदोलन ठिकाणावरून काढता पाय घेत रस्ता पकडला. त्यामुळे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकणारे चांदणे आता थेट आपल्याच प्रभागातील नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नावर सुद्धा दादागिरी केल्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

काय आहे प्रकरण?

पुणे शहरात २०२२ ते फेब्रुवारी २०२६ पर्यंत पालिकेच्या निवडणुकाच पार न पडल्याने शहरावर प्रशासक राज होते, तेव्हा चांदेरेंनी पुणे पालिकेत नव्यानेच समाविष्ट झालेल्या सूस आणि महाळुंगेच्या पायाभूत सुविधांसाठी निधी मंजूर करुन आणला. मात्र तो निधी पोहोचलाच नाही आणि कामे झालेच नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. हा निधी नेमका कुठे खर्च केला आणि विकासकामे कुठे केली? असा सवाल ग्रामस्थ हे चांदेरेंना विचारत आहेत. म्हणूनच आजचा हा ग्रमास्थांचा उद्रेक पाहायला मिळाला.

तर दुसरीकडे, सूस आणि महाळुंगे हे दोन्ही गावे पुणे पालिकेत समाविष्ट झाली. तेव्हा या दोन्ही गावाचे पालकत्व राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबूराव चांदेरे आणि तत्कालीन भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी घेतलं होतं. तसेच त्यांना दर वर्षी या कामासाठी ग्रामस्थ कडून निवेदन देऊन सुद्धा या दोन्ही गावांमध्ये एकही कामे झाली नाहीत. कोणताच विकास झाला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


Related

पुणे : पावसाळा सुरु झाल्यापासून पुण्यातील अनेक भागांमध्ये रस्त्याचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यात चांगले रस्ते कमी आणि खड्ड्यांचे साम्राज्य जास्त अशीच एकूण परिस्थिती आहे. यामध्ये पुण्यातील स्मार्ट सिटी म्हणून ओळखला जाणारा भाग असणारा राधा चौक ते महाळुंगे हा रस्ता संपूर्णतः खड्डेमय झाला आहे. आणि त्या विरोधातच आज महाळुंगे ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरत जोरदार आंदोलन केलं. मात्र नागरिकांना जबाबदारी स्वीकारून उत्तर देण्याऐवजी राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक बाबुराव चांदेरे थेट धमकीच दिली. त्यामुळे नेहमीच हाणामारी, शिवीगाळ आणि भर रस्त्यावर वाद घालण्यासाठी कुप्रसिद्ध असणारे नगरसेवक बाबुराव चांदेरे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

काय आहे प्रकरण?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra