Dailyhunt
बारामतीतून शेवटच्या क्षणी काँग्रेस माघार घेणार; मंत्र्यांच्या दाव्याने नवा ट्विस्ट!

बारामतीतून शेवटच्या क्षणी काँग्रेस माघार घेणार; मंत्र्यांच्या दाव्याने नवा ट्विस्ट!

पुणे : राज्यात जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीवरुन मोठे रणकंदन सुरु आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीतील नेते प्रयत्नशील होते. बारामतीत ओबीसे नेते लक्ष्मण हाके यांनी माघार घेतली, तर दुसरीकडे काँग्रेसने या ठिकाणी आपला उमेदवार निश्चित केला आहे.

मात्र बारामतीची निवडणूक बिनविरोध होणारच, असा ठाम विश्वास राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. यामुळे आता अखेरच्या क्षणी काँग्रेसचा उमेदवार माघार घेईल का? या बाबत चर्चांना उधाण आले आहे.

छगन भुजवळ यांनी पत्रकारांशी संवाद साधतान ही निवडणूक बिनविरोध करण्याची आशा व्यक्त केली. भुजबळ म्हणाले, बारामती पोट-निवडणूक बिनविरोध व्हायला हवी, यासाठी आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत, शेवटच्या क्षणापर्यंत सर्व विरोधी पक्ष उमेदवार यांना विनंती करण्यात येणार आहे, अजितदादा यांच्या आकस्मित अकाली निधनामुळे ही पोट निवडणूक संवेदनशील परिस्थितीत होत आहे. यामुळे राजकीय स्पर्धा, कटुता या ठिकाणी टाळण्याची गरज आहे."

लोकशाही व्यवस्थेत सगळ्यांनाच आपापली भूमिका व्यक्त करण्याचा आणि विनंती करण्याचा अधिकार आहे, लक्ष्मण हाके यांची समजूत काढण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लवकर आपण काँग्रेस पक्षाशी विचार विनिमय करून याबाबत तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करु, असे भुजबळ म्हणाले.


Related

पुणे : राज्यात जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीवरुन मोठे रणकंदन सुरु आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीतील नेते प्रयत्नशील होते. बारामतीत ओबीसे नेते लक्ष्मण हाके यांनी माघार घेतली, तर दुसरीकडे काँग्रेसने या ठिकाणी आपला उमेदवार निश्चित केला आहे. मात्र बारामतीची निवडणूक बिनविरोध होणारच, असा ठाम विश्वास राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. यामुळे आता अखेरच्या क्षणी काँग्रेसचा उमेदवार माघार घेईल का? या बाबत चर्चांना उधाण आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra