Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Devendra Fadnavis News : कुंभमेळा भूसंपादनावरुन राजकारण पेटलं; नाशिक दौऱ्यावेळी फडणवीसांना शेतकरी घेरणार?

Devendra Fadnavis News : कुंभमेळा भूसंपादनावरुन राजकारण पेटलं; नाशिक दौऱ्यावेळी फडणवीसांना शेतकरी घेरणार?

Devendra Fadnavis News : रिंग रोडचा नकाशा बदलून काही अधिकारी आणि राजकीय नेत्यांना फायदा करून देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरू असलेली विकासकामे आता विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.

विशेषतः साधुग्राम आणि कुंभमेळ्याच्या रिंग रोडसाठी होणारे जमीन संपादन हा मुद्दा चांगलाच पेटला आहे. रिंग रोडसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेताना अन्याय केला जात असल्याचा आरोप करत शेतकरी प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहेत. याच मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू असून, आता आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च काढण्याची तयारी सुरू केली आहे.

रिंग रोडच्या भूसंपादनासाठी करण्यात आलेल्या प्रक्रियेवर शेतकऱ्यांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. रिंग रोडचा नकाशा बदलून काही अधिकारी आणि राजकीय नेत्यांना फायदा करून देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे भूसंपादनाचा प्रश्न आता केवळ प्रशासकीय न राहता राजकीय मुद्दाही बनू लागला आहे.

अंबड पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांचा ठिय्या -

मुंबई लॉंग मार्चच्या तयारीचा एक भाग म्हणून आंदोलकांनी गेल्या दोन दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा आणि भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांनी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा आग्रह धरला आहे. यापूर्वी फडणवीस आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत शेतकऱ्यांची चर्चा झाली आहे. मात्र, प्रश्न अद्याप पूर्णपणे मार्गी न लागल्याने आंदोलन सुरूच आहे. मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर असताना आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कुंभमेळा आयुक्तांकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न -

भूसंपादनाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनीही पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच भूसंपादनाचे काम केले जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे प्रशासन आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये संवादातून तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

सत्ताधारी-विरोधकही नाराज?

दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन आणि विकासकामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विरोधी पक्षाच्या खासदारांना जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या कामकाजाच्या पद्धतीवर सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंमध्ये अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी नुकतीच महापालिकेच्या नगरसेवकांशी चर्चा केली. कुंभमेळ्याच्या नियोजनात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहभागाचा मुद्दाही त्यामुळे चर्चेत आला आहे.

कुंभमेळ्याच्या कामांना राजकीय रंग -

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली जात असताना साधुग्राम आणि रिंग रोडच्या भूसंपादनाचा वाद प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. एका बाजूला कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान आहे, तर दुसऱ्या बाजूला जमीन गमावणाऱ्या शेतकऱ्यांचा विरोध तीव्र होत आहे. शेतकऱ्यांचा मुंबई लॉंग मार्च, मुख्यमंत्र्यांचा आगामी नाशिक दौरा आणि आयुक्तांकडून सुरू असलेली तोडगा काढण्याची प्रक्रिया-या तिन्ही घडामोडींमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या रिंग रोडचा भूसंपादन वाद आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे.


Related

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरू असलेली विकासकामे आता विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. विशेषतः साधुग्राम आणि कुंभमेळ्याच्या रिंग रोडसाठी होणारे जमीन संपादन हा मुद्दा चांगलाच पेटला आहे. रिंग रोडसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेताना अन्याय केला जात असल्याचा आरोप करत शेतकरी प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहेत. याच मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू असून, आता आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च काढण्याची तयारी सुरू केली आहे.

अंबड पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांचा ठिय्या -

कुंभमेळा आयुक्तांकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न -

सत्ताधारी-विरोधकही नाराज?

कुंभमेळ्याच्या कामांना राजकीय रंग -

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra