Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Dipali Sayyed News : 'चाकणकरांची भूमिका करू नका, नाहीतर करिअर उध्वस्त.,' ; दिपाली सय्यद यांना धमक्या!

Dipali Sayyed News : 'चाकणकरांची भूमिका करू नका, नाहीतर करिअर उध्वस्त.,' ; दिपाली सय्यद यांना धमक्या!

Dipali sayyed on rupali chakankar : मी अशा दबावाला घाबरत नाही, मी या चित्रपटात काम करणारच," असं देखील सय्यद यांनी ठणकावून सांगितले.

मुंबई (चेतन झडपे) : शिवसेना पक्षाच्या महिला नेत्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री दिपाली सय्यद यांना धमकीच्या फोन येत आहेत, असा धक्कादायक दावा सय्यद यांच्याकडून करण्यात आला आहे.

देशभर खळबळ माजवलेल्या भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणावर एक मराठी चित्रपट येणार आहे आणि या चित्रपटात खरातला आपला अध्यात्मिक गुरु मानणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका दिपाली सय्यद करणार, अशा आशयाच्या बातम्या प्रसारीत झाल्या होत्या. यानंतर आता सय्यद यांना राजकारणातील काही महिला नेत्यांचा धमकी आल्याचा दावा सय्यद यांनी केला आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना दिपाली सय्यद यांनी हा दावा केला आहे. सय्यद म्हणाल्या, "या चित्रपटाचं स्क्रिप्ट आलं आहे. मला भोंदूबाबा प्रकरण चित्रपटाच्या भूमिकेबाबत विचारणा झाली. मी सध्या याची स्क्रिप्ट वाचत आहे. हे स्क्रिप्ट वाचत असताना मला भोंदूबाबा खरातचं प्रकरण मला कळलं आहे. मी चार महिने बीग बॉसच्या घरात होते, त्यामुळे मला याबाबत पूर्ण माहिती नव्हती."

"भोंदूबाबा प्रकणात खूप मोठे मोठे लोक गुंतले आहेत. त्यामुळे अशा गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. याबाबत श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबाबत लोकांना कळलं पाहिजे. हे मला स्क्रिप्ट वाचताना जाणवतंय, त्यामुळे या प्रोजेक्टवर काम करताना मजा येईल, असेही सय्यद म्हणाल्या.

धमक्यांचे फोन येत आहेत -

"या प्रकरणात अनेक मोठी नावं गुंतलेली आहेत. पण तरीही कलाकार म्हणून माझ्यावर कुणी दबाव आणू नये. तरी देखील मला फोन येत आहेत. मला वाटतं की, कर नाही त्याला डर कशाला? तुम्ही काही केलं नसेल तर तुम्हाला कसलीही भीती नसली पाहिजे. पण काहींनी भीती वाटत असेल तर मग जो कोणी काम करतंय त्यांना अडकवणं चुकीचं आहे. मी काम करते, मी एक कलाकार आहे. कला हे माझं व्यवसाय आहे. माझ्या कलेला मी न्याय देणार आहे. जर मला माझी कला थांबवण्यासाठी मला फोन येत असतील. ते ही चुकीचं आहे, अशी खंत सय्यद यांनी व्यक्त केली.

"मला यासाठी फोन आलेला आहे की, तुम्ही या चित्रपटात काम करु नका. थोडसं थांबायला सांगत आहेत. अशी भूमिका करु नका. राजकीय दबाव आणतायेत. तुझं राजकीय करिअर उध्वस्त करु, असे मला राजकारणातील महिला नेत्यांचे फोन आले. असं फोन येणं पण चुकीचं आहे. मी अशा दबावाला घाबरत नाही, मी या चित्रपटात काम करणारच," असं देखील सय्यद यांनी ठणकावून सांगितले.

पक्षश्रेष्ठींशी याबाबत बोलणार -

"या धमक्यांचे फोनबाबत मी माझ्या पक्षाच्या शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींशी बोलणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेंबांशी मी नक्कीच या विषयावर बोलणार आहे. त्याचप्रमाणे मी श्रीकांत शिंदे साहेबांशी देखील याबाबत बोलणार आहे. त्यांच्यासमोर मी हे कोणाचे फोन आले, याचा खुलासा करणार आहे," असे सय्यद यांनी स्पष्ट केले.


Related

मुंबई (चेतन झडपे) : शिवसेना पक्षाच्या महिला नेत्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री दिपाली सय्यद यांना धमकीच्या फोन येत आहेत, असा धक्कादायक दावा सय्यद यांच्याकडून करण्यात आला आहे. देशभर खळबळ माजवलेल्या भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणावर एक मराठी चित्रपट येणार आहे आणि या चित्रपटात खरातला आपला अध्यात्मिक गुरु मानणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका दिपाली सय्यद करणार, अशा आशयाच्या बातम्या प्रसारीत झाल्या होत्या. यानंतर आता सय्यद यांना राजकारणातील काही महिला नेत्यांचा धमकी आल्याचा दावा सय्यद यांनी केला आहे.

धमक्यांचे फोन येत आहेत -

पक्षश्रेष्ठींशी याबाबत बोलणार -

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra