Friday, 11 Jun, 9.16 am Political महाराष्ट्र

होम
'हमीभावात केलेली वाढ हा केंद्र सरकारचा जुमला'

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप पिकांच्या हमीभावात वाढव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यंदा 14 खरीप पिकांचे किमान हमीभाव क्विंटलमागे 72 ते 425 रुपयांनी वाढवण्याची घोषणा केंद्राकडून करण्यात आली होती. मात्र ही वाढ म्हणजे केंद्र सरकारचा जुमला असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

हमीभावात केलेली वाढ हा केंद्र सरकारचा जुमला आहे. इतका हमीभाव वाढवत असल्याचा सरकारचा दावा कणत्याही तज्ज्ञाने उत्पादन खर्चाचा विचार करून सिद्ध करून दाखवावा, असे आव्हानच राजू शेट्टी यांनी सरकारला दिले आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी मोदी सरकारने जाहीर केलेला हमीभाव हा जुमला आहे. शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

शेती कसणे महागाईमुळे सोपे राहिलेले नाही. मशागत, खत, इंधन, बियाणे यांचा भरमसाठ खर्च वाढला आहे. शासनाने हमीभावासंदर्भात घोषणा करताना या वाढलेल्या किंमतीचा विचार केलेला नाही. शेतकरी कोणाकडे भीक मागत नाहीत तर घामाचे दाम मागत असल्याचे ते म्हणाले.

Read Also :

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra
Top