कर्नाटक (चेतन झडपे ) : कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग आले आहे. उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी मुख्यमंत्री सिद्धरमैया यांची भेट घेतली आहे. शिवकुमार यांनी सिद्धरमैयांचे आशिर्वाद घतले आहेत.
मुख्यमंत्री सिद्धरमैया हे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आजच देण्याची शक्यता आहे. तर शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. पुढील मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या नावाची जोरदार शक्यता आहे.
कर्नाटकात या पुढे चार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. अडीच अडीच वर्षाच्या सत्तेच्या फॉर्म्युल्यानुसार नेतृत्वात हा मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस हा कर्नाटकच्या राजकीय वर्तुळासाठी महत्त्वपूर्ण आहे. मोठे सत्ताबदलाचे वारे कर्नाटकात वाहत आहेत. सिद्धरमैया राजीनामा देतील आणि डी के शिवकुमार हे मुख्यमंत्री होतील, याची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे, अशी स्थिती कर्नाटकात आहे.
डी के शिवकुमार हे मुख्यमंत्री होतील. तर त्यांच्या मंत्रिमंडळात चार नवे उपमुख्यमंत्री बनवले जातील. मंत्रिमंडलात दलित, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय असं सामाजिक संतुलन राखण्यात येणार आहे. नव्या मंत्रिमंडळात नवे आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्ययची तयारी काँग्रेसने केली आहे. सध्याचे केवळ १५ ते २० मंत्रिच नव्या मंत्रिमडळात राहतील आणि बाकीच्यांना डच्चू देण्यात येणार आहे. २०२८ च्या निवडणुकांचा विचार करता, मंत्रिमंडळाची रचना करण्यात येणार आहे.
Related
कर्नाटक (चेतन झडपे ) : कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग आले आहे. उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी मुख्यमंत्री सिद्धरमैया यांची भेट घेतली आहे. शिवकुमार यांनी सिद्धरमैयांचे आशिर्वाद घतले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरमैया हे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आजच देण्याची शक्यता आहे. तर शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. पुढील मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या नावाची जोरदार शक्यता आहे.

