नवी मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याने केलेले काळ्या कारनामांची मालिका संपताना दिसत नाही, अनेक गुन्हे आणि खुलासे याबाबत होत आहेत. खरातने अनेक महिलांचे केलेल्या लैंगिक अत्याचारावर अनेक टिका टिप्पण्णी होत आहेत.
यामध्ये खरातने कथित दैवी गोष्टींची आमिष किंवा भय दाखवून महिलांचे शोषण केले, असे म्हंटले जाते आहे. तर दुसरीकडे खरात एवढ्याच संबंधित महिला देखील दोषी असल्याचे काहींचे म्हणणे आहे. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी परखड मत व्यक्त केले आहे. 'खरात सोबत असलेल्या कोणत्या महिला तुम्हाला बेशुद्ध वाटतात,' असे ठाकरे म्हणाल्या.
भोंदूबाबा खरातने महिलांना गुंगीचे औषध देऊन अत्याचार केले, असेही आरोप करण्यात आले आहेत. खरातच्या विरोधात महिला अत्याचाराचे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. अशोक खरातचे महिलांसोबत कार्यालयातच लैंगिक संबंध ठेवल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.
नवी मुंबई महापालिकेतील मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन शर्मिला ठाकरे यांच्य़ा हस्ते झाले. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी भोंदूबाबा खरातच्या काळ्या कारनाम्यांवर तीव्र संताप व्यक्त केला.
सोबतच लैंगिक अत्याचाराला बळी ठरलेल्या महिलांच्या भूमिकेबद्दलही शंका व्यक्त केली.
ठाकरे म्हणाल्या, "भोंदूबाबांकडे जायचे बंद करा. आपला समाज हा कुठे चालला आहे, असा प्रश्न पडतो. आपल्या महाराष्ट्र राज्याला संताचा, समाजसुधारकांचा मोठा इतिहास आहे. असे प्रकार पाहिल्यावर लोक वेडी झाली आहेत का? मला कळतच नाही. खरातसोबत असलेल्या महिला आपल्याला बेशु्ध वाटतात का? महिलांना कळायला पाहिजे."
"मनसेचे ज्यावेळी १३ आमदार निवडून आले होते. त्यावेळी काही बाबा वगैरे लोक भेटायला आले. आम्ही स्पष्ट सांगितलं की, आम्ही तुमच्या पाया तुमच्या पाया पडणार नाही. भेटायला या आणि जा," असेही ठाकरेंनी एक आठवण सांगितली.
Related
नवी मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याने केलेले काळ्या कारनामांची मालिका संपताना दिसत नाही, अनेक गुन्हे आणि खुलासे याबाबत होत आहेत. खरातने अनेक महिलांचे केलेल्या लैंगिक अत्याचारावर अनेक टिका टिप्पण्णी होत आहेत. यामध्ये खरातने कथित दैवी गोष्टींची आमिष किंवा भय दाखवून महिलांचे शोषण केले, असे म्हंटले जाते आहे. तर दुसरीकडे खरात एवढ्याच संबंधित महिला देखील दोषी असल्याचे काहींचे म्हणणे आहे. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी परखड मत व्यक्त केले आहे. 'खरात सोबत असलेल्या कोणत्या महिला तुम्हाला बेशुद्ध वाटतात,' असे ठाकरे म्हणाल्या.

