पुणे : राज्यात जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीवरुन राजकीय घडमोडींनी वेग आला आहे. बारामतीत ओबीसे नेते लक्ष्मण हाके यांनी माघार घेतली तर काँग्रेसने या ठिकाणी आपला उमेदवार निश्चित केला आहे.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीतील नेते प्रयत्नशील होते. मात्र आता बिनविरोधाच्या शक्यता मावळल्यानंतर आणि काँग्रेसने जोरदारपणे शड्डू ठोकल्यानंतर आता उलटसुलट प्रतिक्रियांना उधाण आले आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर निशाणा साधत जहरी टिका केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.
बारामतीत निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतील नेते प्रयत्न करत असताना, काँग्रेसने अॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि काँग्रेसचे उमेदवार मोरे यांचा सामना होणार आहे. यावर बावनकुळे यांनी काँग्रेसवर टिका करत जोरदार प्रहार केला आहे. बावनकुळे म्हणाले, "मी आज बारामतीमध्ये जात आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा फॉर्म आम्ही भरणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की, राहुरी आणि बारामती दोन्ही जागा आम्ही जिंकणारच."
"सर्व पक्षांना विनंती करतो की दिवंगत नेते अजित पवारांचा जो जीवन प्रवास राहिला आहे तो सगळा प्रवास काँग्रेस सोबत राहिला आहे. काँग्रेस पक्षाशी त्यांचा सहवास आणि संपर्क होता. बारामतीमध्ये काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवू नये, अशी आमची इच्छा आहे. अजित पवारांची जागा वेगळी आहे. खरंतर काँग्रेस पक्षाने अजित दादांचा विचार करायला हवा. जर काँग्रेस पक्षाला संस्कार आणि संस्कृती राहिली नसेल तर त्यांनी ही निवडणूक लढावी," असे बावनकुळे म्हणाले.
Related
पुणे : राज्यात जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीवरुन राजकीय घडमोडींनी वेग आला आहे. बारामतीत ओबीसे नेते लक्ष्मण हाके यांनी माघार घेतली तर काँग्रेसने या ठिकाणी आपला उमेदवार निश्चित केला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीतील नेते प्रयत्नशील होते. मात्र आता बिनविरोधाच्या शक्यता मावळल्यानंतर आणि काँग्रेसने जोरदारपणे शड्डू ठोकल्यानंतर आता उलटसुलट प्रतिक्रियांना उधाण आले आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर निशाणा साधत जहरी टिका केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.

