पुणे : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतील नेते प्रयत्नशील होते.
मात्र या ठिकाणी काँग्रेसकडून अॅड. आकाश मोरे यांना उमेवदवारी जाहीर केली तर दुसरीकडे ओबीसी नेते म्हणून अशी ओळख मिळवलेले लक्ष्मण हाके यांनीही ही पोटनिवडणूक लढवणारच असा ठाम निर्धार व्यक्त केला होता. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या काही तास उरले असताना, हाके यांनी माघार घेत आपली तलवार म्यान केली. त्यामुळे बारामतीमध्ये मराठा विरुद्ध धनगर अशा मतांच्या ध्रुवीकरणाच्या वातावरणाला पूर्णविराम लागले आहे.
लक्ष्मण हाके यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार अशी, वल्गणा केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दत्तात्रय भरणे यांनी हाकेंची भेट घेतली. या भेटीत झालेल्या शिष्टाईनंतर अखेर हाके यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले. दोन्ही नेत्यांनी पत्रकार घेतली. या परिषदेत हाकेंनी माघार घेतल्याचे जाहीर केले. यामुळे हाके यांनी दावा केलेल्या ओबीसींचे प्रश्न या निवडणुकीच्या माध्यमातून अधिक आक्रमक मांडणार, या लढाईचे काय होणार? असा प्रश्न आता विचारला जाऊ शकतो.
दत्तात्रय भरणे आणि लक्ष्मण हाके यांच्या एकत्रित पत्रकार परिषदेत हाकेंनी आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्याला विनंती केल्याबद्दल आपण माघार घेत असल्याचे हाके म्हणाले. तसेच मुख्यमंत्री यांनी आपल्याशी याबाबत संवाद साधला आणि अनेक वरिष्ठांनी आपल्याला माघारीसाठी विनंती केली, असेही हाके म्हणाले.
Related
पुणे : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतील नेते प्रयत्नशील होते. मात्र या ठिकाणी काँग्रेसकडून अॅड. आकाश मोरे यांना उमेवदवारी जाहीर केली तर दुसरीकडे ओबीसी नेते म्हणून अशी ओळख मिळवलेले लक्ष्मण हाके यांनीही ही पोटनिवडणूक लढवणारच असा ठाम निर्धार व्यक्त केला होता. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या काही तास उरले असताना, हाके यांनी माघार घेत आपली तलवार म्यान केली. त्यामुळे बारामतीमध्ये मराठा विरुद्ध धनगर अशा मतांच्या ध्रुवीकरणाच्या वातावरणाला पूर्णविराम लागले आहे.

